महाराष्ट्र
बुद्धांचा धम्म गतिमान करण्यासाठी गावोगावी विहारे निर्माण होणे गरजेचे-प्रा.किसन चव्हाण
By Admin
बुद्धांचा धम्म गतिमान करण्यासाठी गावोगावी विहारे निर्माण होणे गरजेचे-प्रा.किसन चव्हाण
बुद्ध मुर्तीची मिरवणुक काढुन विहारात केली प्रतिष्ठापना
पाथर्डी- प्रतिनिधी
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी गावोगावी विहारे निर्माण करून ते विहारे परिवर्तनाचे केंद्र बिंदु व्हावेत, तरच धम्म सर्वदुर पसरेल,असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांनी केले. ते बुद्ध पोर्णिमे निम्मीत्ताने बुद्ध मुर्ती प्रतिष्ठापना व धम्म यात्रे निम्मीत्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणुन बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बॄहन्मुंबई महानगरपालिकाचे माजी नगरसेवक ॲड.जी.डी.घोक्षे होते.
दिवंगत मोहनराव गाडे यांनी तनपुरवाडी शिवारात ४० वर्षापुर्वी पायाभरणी केलेल्या विहाराचे बांधकाम त्यांचे चिरंजीव व पाथर्डी तालुका आंबेडकरी चळवळीचे नेते तथा राजर्षी छत्रपती शाहु महाराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिगंबर गाडे , बौद्धाचार्य वसंतराव बोर्डे यांनी तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांना बरोबर घेऊन पुर्ण केले व सोमवारी बौद्ध पौर्णिमेला भगवान बुद्धांची मुर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली.
अध्यक्षस्थाना वरून बोलतांना ॲड. जी.डी.घोक्षे म्हणाले, आपण महापुरूषांचे भक्त न होता, अनुयायी व्हावे व या महापुरूषांचे विचार प्रथम अंगीकारून त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी परिश्रम करावे, तरच आपन काहीतरी क्रांती करू शकतो. ॲड. घोक्षेंनी या विहारासाठी महापुरूषांचे पुस्तके व अनेक ग्रंथ भेट दिली.
या वेळी जेष्ठ स्वतंत्र्य सैनिक दिवंगत मोहनरावजी गाडे जिवन गौरव पुरस्कार भारतीय स्टेट बॅकेचे माजी शाखाधिकारी तथा बुद्ध- फुले- शाहु- आंबेडकर चळवळीचे सक्रिय कार्यकर्ते अंबादास रगडे यांना देण्यात आला. या वेळी बहुजन नेते रामराव चव्हाण ,सोमठाणे नलवडे गावचे उपसरपंच आकाश दौंडे व करंजीचे उपसरपंच नवनाथ आरोळे यांचाही सत्कार करण्यात आला.
तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारावर रामराव चव्हाण, माजी सभापती काकासाहेब शिंदे, सिताराम बोरूडे, अंबादास आरोळे, जेष्ठ साहीत्तीक रामकिसन पाराजी शिरसाट ,धम्म अभ्यासक निशांत सातपुते, विष्णु बुगे आदिंनी विचार मांडले.
या वेळी माजी प्राचार्य रतिलाल क्षेत्रे , स्वामी सर्मथ पतसंस्था पाथर्डी चे व्हाईस चेअरमन एकनाथ ठोकळ, जेष्ठ साहीत्तीक प्राचार्य दिलिप सरसे, संजय साळवे ,आर. पी. आय. चे पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरु, मा.सरपंच रंगनाथ माघाडे, किशोर राजगुरू, श्रीपत बळीद, मुख्यलिपिक महेद्र राजगुरू,धर्माजी गाडे , सुंदरमामा कांबळे ,डाॅ.छगन सरोदे , पप्पुशेठ बोर्डे, संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष वैभव दहिफळे, गणेश सरोदे, ग्रा.प.सदस्य बाळासाहेब कांबळे, ग्रा.प.सदस्य आनंद रंधवे, रिपब्लिकन सेना पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबासाहेब रंधवे, कैलास वेलदोडे, सुशिलकुमार रगडे , सचिन साळवे, ग्रामसेवक सचिन दळवी, संजय कांबळे, नितिन बळीद ,गणपत कटारनवरे, आनंद उबाळे, आनंद पंडागळे, कैलास शिंदे, रोहीणीताई ठोंबे, गणेश रंधवे, महादेव गाडे , गोरक्ष राजगुरू,रविंद्र श्रीपत बळिद आदीसह बहुसंख्येने माता भगीनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिगंबर गाडे यांनी केले. सूत्रसंचालन बौद्धाचार्य वसंतराव बोर्डे यांनी केले तर आभार हाजी हुमायुन आतार यांनी मानले.
Tags :
50698
10