युक्रेन देशातून विद्यार्थ्यांना आणण्यावरूनही राजकारण होणे दुर्दैवी यांनी केली टिका
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
खासदार सुप्रिया सुळे या एका खासगी कार्यक्रमासाठी अहमदनगर येथे आल्या असता त्यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे म्हणाल्या, परदेशात अडकलेल्या कोणालाही भारतीय नागरिकाला परत आणणे हे केंद्र सरकारचे काम आहे. मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही हजारो भारतीय नागरिक परत आणले. विद्यार्थ्यांना युक्रेनमधून आणण्यावरूनही राजकारण होणे हे दुर्दैवी आहे. अशा गोष्टीत राजकारण होऊ नये असे माझे वैयक्तिक मत आहे.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी केंद्र सरकारने मोफत आणले, राज्य सरकारने महाराष्ट्रतील विद्यार्थ्यांना आणणाऱ्या एक तरी विमानाचा खर्च उचलावा अशी टीका केली होती.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी खासदार डॉ. सुजय विखे पाटील ( Dr. Sujay Vikhe Patil ) यांच्या टीकेला चोख प्रतिउत्तर दिले. ( It is unfortunate that politics is also taking place after bringing students from Ukraine )
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यावर खासदार सुळे म्हणाल्या, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. जे झाले ते दुर्दैवी असल्याचे सुळे यांनी सांगितले.