जायकवाडी धरणातून 1 लाख 13 हजार क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग, 620 कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना
By Admin
जायकवाडी धरणातून 1 लाख 13 हजार क्यूसेकनं पाण्याचा विसर्ग, 620 कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) सद्या 90 हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळं धरणातून 1 लाख 13 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर गरज पडल्यास पाण्याचा विसर्ग वाढवून दीड लाख करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळं पैठण शहरातील 620 कुटुंबांना स्थलांतराच्या सूचना स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
जायकवाडी धरणाचे एकूण 27 दरवाजे उघडण्यात आले आहे. ज्यात 9 आपत्कालीन दरवाजांचा सुद्धा समावेश आहे. तर दीड लाख क्युसेकने पाणी सोडल्यास पुराचे पाणी पैठण शहरात घुसण्याची शक्यता असते. त्यामुळं पैठण नगरपरिषदेने आशा भागातील नागरीकांना स्थलांतराच्या सूचना दिल्या आहे. तर काही नागरिकांचे स्थलांतर सुद्धा करण्यात आले आहे.
या भागातील नागरिकांचे करणार स्थलांतर...
मौलाना साहब दर्गा परिसर नदी किनाऱ्याच्या ठिकाणी 100 कुटुंब असून नदीचे पाणी जास्त आल्यास नदीकडे जाणारे नाले बंद होऊन पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता असते. त्यामुळं सदर कुटुंबाचा संपर्क तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं स्थलांतर करणं गरजेचं आहे. शनी मंदीर परिसर नदी किनाऱ्याच्या ठिकाणी 100 कुटुंब असून नदीचे पाणी जास्त आल्यास नदीकडे जाणारे नाले बंद होऊन पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता असते. त्यामुळे सदर कुटुंबाचा संपर्क तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थलांतर करणे गरजेचे आहे.
रंगारहट्टी ले गागाभट्ट चौक ते मोक्षघाट पर्यंत नदी किनाऱ्याच्या ठिकाणच्या 20 कुटुंब असून नदीचे पाणी जास्त आल्यास सदर कुटुंबांची तात्पुरते स्वरुपाची घरे पाण्यात जातात त्यामुळे स्थलांतर करणे गरजेचे आहे. साठेनगर व लहुजीनगर नदीपात्रात जाणान्या मुख्य नाला बाजुचे (सखोल भागत) ठिकाण: 150 कुटुंब असुन नदीचे पाणी जास्त आल्यास नदीकडे जाणारे नाले बंद होवुन पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता असते तसेच लहुजी नगर येथील परिसरात कुटुंबाच्या घरात पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थलांतर करणे गरजेचे आहे. कहारवाडा नदीपात्रात जाणान्या मुख्य नाला बाजुचे (सखोल भागत) ठिकाणी 150 कुटुंब असुन नदीचे पाणी जास्त आल्यास नदीकडे जाणारे नाले बंद होवुन पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता असते. तसेच लहुजी नगर येथील परिसरात कुटुंबाच्या घरात पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थलांतर करणे गरजेचे आहे.
संतनगर नदीपात्रात जाणाऱ्या मुख्य नाला बाजुच्या (सखोल भागत) भागात 100 कुटुंब असून नदीचे पाणी जास्त आल्यास नदीकडे जाणारे नाले बंद होवुन पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता असते. तसेच लहुजी नगर येथील परिसरात कुटुंबाच्या घरात पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थलांतर करणे गरजेचे आहे.