सैनिकी मुला/मुलींचे वसतिगृहासाठी एकत्रित मानधनावर अशासकीय कर्मचाऱ्यांचे पदे भरण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हयातील युद्धविधवा/माजी सैनिक विधवा व माजी सैनिक यांना कळविण्यात येते की सैनिकी मुला/मुलीचे वसतिगृहे, अहमदनगर व कोपरगाव येथे वसतिगृहासाठी निवळ तात्पुरत्या स्वरुपात दैनंदिन रोजंदारीवर एकत्रित मानधनावर पुढील अशासकिय कर्मचाऱ्यांची पदे भरण्याकरिता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहमदनगर यांचेमार्फत नमुद केलेल्या अटींच्या अधिन राहून अर्ज मागवण्यात येत आहेत.
तरी इच्छुक युद्धविधवा/माजी सैनिक विधवा व माजी सैनिक यांनी २० मे, २०२२ पर्यंत आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अहमदनगर येथे सादर करावेत.
पदांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. सहायक वसतिगृह अधीक्षक/अधीक्षीका-मासिक मानधन ९,९०२/- रुपये पहारेकरी-मासिक मानधन ८,९११/-, स्वयंपाकी-मासिक मानधन ५,९४१/- रुपये, सफाई कामगार-मासिक मानधन ५,६५८/-, माळी कामगार-मासिक मानधन ४,९२०/- रुपये. युद्धविधवा/माजी सैनिक विधवा व माजी सैनिक यांचे अर्ज दिनांक २० मे, २०२२ पर्यंत न पोहचल्यास इतर नागरिकांचा विचार केला जाईल याची नोंद घ्यावी. पदसंख्या तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संदीप निचित यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे केले आहे.