उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक आहेत. अंकुश चितळे
पाथर्डी- प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात उद्भवलेल्या अद्भुत राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेना पक्ष मोठ्या संकटातून जात आहे. या संकटातून सावरण्यासाठी पाथर्डी तालुकाप्रमुख अंकुश चितळे यांनी पैठण या तीर्थक्षेत्री जात गंगास्नान करून संत एकनाथ महाराजांच्या समोर नतमस्तक होत, या सर्व राजकीय संकटातून महाराष्ट्र राज्य मुक्त व्हावे व शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना पक्षावर आलेले संकट दूर व्हावे तसेच शिवसेना पक्ष व संघटना पुन्हा मोठ्या मजबुतीने उभी राहावी यासाठी साकडे घातले.
याविषयी बोलतांना अंकुश चितळे म्हणाले की, शिवसेना पक्ष हा आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट विचारावर चालणारा पक्ष आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांची वंदनिय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर श्रद्धा असल्याने आदरणीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक असल्याने अशा संकटांना शिवसेना घाबरत नाही. पुन्हा नव्या जोमाने शिवसेना उभा राहिल. पक्षप्रमुखांनी कुठलीही काळजी करू नये. या संकटात शिवसैनिक शिवसेना पक्ष मोठ्या मेहनतीने, ताकतीने व मजबुतीने उभा करतील, असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी तालुका उपप्रमुख ऋषी गव्हाणे, भाऊसाहेब निमसे, नवनाथ वाघ, सरपंच संजय चितळे, उपसरपंच अशोक चितळे, माजी संचालक ज्ञानदेव गायखे, दादा चितळे, विष्णु कोठे, दादासाहेब चितळे, ह. भ. प.दत्तू महाराज, विष्णू ढाकणे आदींची उपस्थिती होती.