महाराष्ट्र
श्री क्षेत्र मोहटादेवी- ग्रामस्थ, दुकानदार, व्यवसायिकांनी मोहटादेवीच्या स्थानाला प्राधान्य
By Admin
पाथर्डी-श्री क्षेत्र मोहटादेवी- ग्रामस्थ, दुकानदार, व्यवसायिकांनी मोहटादेवीच्या स्थानाला प्राधान्य देऊन देवस्थान समिती व प्रशासनाला सहकार्य करावे.
शारदीय नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहटादेवी गडावर सर्व प्रशासकीय विभाग प्रमुखांची नियोजन आढावा बैठक
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
नवरात्र उत्सव काळात मोहटादेवीच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भक्तांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी देवस्थान समितीबरोबर योग्य समन्वय साधून प्रशासनाच्या सर्व विभागांनी कामांना प्राधान्य देऊन काम करावे.
उत्सव कालावधीत सरकारी विभाग प्रमुखांनी त्यांचा संपर्क कायम ठेवावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी दिला. आगामी शारदीय नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहटादेवी गडावर सर्व प्रशासकीय विभाग प्रमुखांची नियोजन आढावा बैठक प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षेतेखाली आयोजित करण्यात आली.
बैठकीसाठी जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी, सहदिवाणी न्यायाधीश एम. डी. गौतम, तहसीलदार श्याम वाडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील, पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, तालुका आरोग्याधिकारी डॉ. भगवान दराडे, राष्ट्रीय महामार्गाच्या स्मिता पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे वसंत बडे, वीज वितरणचे सुनील अहिरे, एस.टी. महामंडळाचे महेश कासार, पाथर्डी नगरपरिषदचे अय्युब सय्यद, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. सचिन दरंदले,पंचायत समितीच्या जिल्हा परिषद बांधकाम विभाग, वन विभागांचे प्रतिनिधीची उपस्थित होते.
सोमवार, 26 सप्टेंबर ते रविवार, 9 ऑक्टोबर या दरम्यान नवरात्र उत्सव होत आहे. यासाठी मोहटा देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक राज्यसह इतर राज्यातून येतात. त्यासाठी यात्रा सुरळीत पार पाडावी म्हणून मोहटा देवी देवस्थान आणि तालुका प्रशासनाची समन्वय बैठक शनिवारी दुपारी घेण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष, जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी म्हणाले, नवरात्र उत्सव नियोजनात काही त्रुटी राहिल्या, तर संबंधित विभागाला दोष न देता ते काम आपले समजून दूर करण्याचा प्रयत्न करू, तसेच मोहटादेवीच्या या स्थानामुळे जगाच्या नकाशावर गाव येऊन महत्व प्राप्त झाले. ग्रामस्थ, दुकानदार, व्यवसायिकांनी मोहटादेवीच्या स्थानाला प्राधान्य देऊन देवस्थान समिती व प्रशासनाला सहकार्य करावे.
उत्सव कालावधीत एका विभागाचे काम चांगले झाले नाही, तर तो चर्चेचा विषय ठरेल. मंदिर प्रशासनाकडून जास्तीत जास्त मदत केली जाईल. सर्व प्रशासकीय विभागांच्या कामाचा आढावा घेऊन कामांबाबत माहिती देवदत्त केकाण यांनी जाणून घेतली. त्यावर मार्ग काढून काम पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले. मोहटादेवस्थांचे विश्वस्त अॅड. विजयकुमार वेलदे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, भीमराव पालवे, अशोक दहिफळे, माजी विश्वस्त संदीप पालवे, गुप्तवार्ताचे भगवान सानप आदी उपस्थित होते. कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी आभार मानले.
Tags :
266
10