महाराष्ट्र
चोर्यांचे व मारहाणीचे सत्र थांबण्यासाठी शहरातील नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला
By Admin
चोर्यांचे व मारहाणीचे सत्र थांबण्यासाठी शहरातील नागरिकांनी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी शहरासह तालुक्यात चोर्यांचे प्रमाण वाढले असून, काही घटनांमध्ये दरोडेखोरांकडून बेदम मारहाण करुन ऐवज लंपास केला जात आहे.
या वाढत्या चोर्यांचे व मारहाणीचे सत्र थांबून अशा गुन्हेगारांना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी शहरातील नागरिकांनी पाथर्डी पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत या घटनांचा निषेध व्यक्त केला. शहरात जुना खेर्डा रस्त्यावरील बोरुडेवस्ती येथे गुरुवारी रात्री अकरा वाजता चार चोरटयांनी चोरी करून घरातील तीन व्यक्तींना चाकूने वार गंभीर जखमी केले. या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करुन पोलिसांची गस्त वाढवावी, गुन्हेगारांवर वचक ठेवावा, या मागणीसाठी हा मोर्चा शहरातील बोरुडे वस्ती, साखरे वस्ती, सोनटक्के वस्ती, बालवेवस्ती, काळेवस्ती, केरकळ मळा या भागांतील नागरिकांनी काढला होता.
यावेळी माजी नगरसेवक बंडू बोरुडे, माजी उपनगराध्यक्ष विठ्ठल ऊर्फ बंडू बोरुडे, सीताराम बोरुडे, सोमनाथ बोरुडे, पांडुरंग सोनटक्के, दत्ता सोनटक्के, बबलू वावरे, राजेंद्र बोरुडे, दिगंबर गाडे, संजय बोरुडे, नाना पालवे, अक्षय काळे, नीलेश साखरे, बबन साखरे, हरिभाऊ साखरे, उमेश साखरे, राहुल बोरुडे, राजेंद्र बालवे, संतोष वाघमारे आदीसह नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी सीताराम बोरुडे, सोमनाथ बोरुडे, दिगंबर गाडे, बंडू पाटील बोरुडे यांची भाषणे झाली. पोलिसांचा वचक गुन्हेगारांवर राहिला तर पुन्हा भविष्यात अशा घटना घडणार नाही. भविष्यात अशा घटना घडल्या तर आम्ही सर्व रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. या आरोपींना आठ दिवसांत अटक करावी, अन्यथा तालुका शहर बंद करू, असा इशारा यावेळी मोर्चेकर्यांनी दिला. या परिसरातील वाड्यावरती शस्त्र बाळगण्याचा परवाने पोलिसांनी द्यावेत, अशी ही मागणी मोर्चेकर्यांनी केली.
बोरुडे वस्तीवरील घटनेतील आरोपींच्या शोधासाठी एक पथक तपास करत असून हे सर्व आरोपींना लवकरच अटक केले जातील. तालुक्यात अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी वाड्या-वस्त्यांवर अधिक गस्त वाढवली जाईल. यासाठी पोलिसांची स्वतंत्र व्यवस्था करून नागरिकांचे समाधान होईल, असे काम केले जाईल.
-सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक,
Tags :
46679
10