पाथर्डी तालुक्यात मिठाईची दोन दुकाने फोडली
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील एकाच मालकाचे दोन मिठाईची दुकाने चोरट्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी घडली. शहरातील शेवगाव रस्त्यावरील जुन्या बसस्थानक रस्त्यासमोर असलेल्या हरी ओम बिकानेर स्वीट अॅण्ड बेकरी मिठाईचे दुकान तसेच नगर रस्त्यावरील भांडकर कॉम्पलेक्समधील हरी ओम बिकानेर स्वीट चोरट्यांने या दोघांच्या शटरचे कुलूप तोडून चोरी केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे.
याबाबत दुकान मालक हरचंदासिंह नखतासिंह राजपुरोहित यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुरोहित यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मंगळवारी ( दि.2)रोजी सकाळी आठ वाजता दुकान मालक हरी ओम बिकानेर स्वीट दुकान उघडण्यासाठीा आले असता, दुकानाचे लोखडी कुलुप तुटलेले दिसले. दुकानाचे शटर वर झालेले होते. त्यानंतर मालकाने दुकानात जाऊन पाहिले असता, दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. दुकानातील काउंटरमध्ये ठेवलेले चार हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. भांडकर कॉम्प्लेक्समधील नगर रस्त्यावरील हरी ओम बिकानेर स्वीट नावाच्या दुकानाचेही कुलूप तोडून पाचशे रुपयांची रोकड चोरून नेली.