महाराष्ट्र
केदारनाथ भाविकांच्या वाहनावर दरड कोसळली
By Admin
केदारनाथ भाविकांच्या वाहनावर दरड कोसळली
अहमदनगरमधील 'या' तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू; तीन जखमी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बद्रिनाथ देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या एका वाहनावर दरड कोसळल्याने श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील पुष्पा मोहन भोसले (वय 62) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
या अपघातात 9 प्रवासी जखमी झाले असून त्यामधील तीन प्रवासी हे नगर जिल्ह्यातील आहेत.
मागील महिन्यात सुद्धा अशाच प्रकारची घटना या ठिकाणी घडलेली होती नगर शहरातील दोन जणांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू झालेला होता. या घटना ताज्या असतानाच आता शुक्रवारी पुन्हा या यात्रेदरम्यान एक अपघात झाला. या घटनेची माहिती येथील नगर प्रशासनाला मिळाल्यानंतर संबंधित यंत्रणा ही या जखमींवर कोठे उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती कशी आहे याबाबतची माहिती घेण्यास सुरुवात केलेली आहे. तसेच यांच्या नातेवाईकांना सुद्धा याची माहिती येथील प्रशासनाने दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, हिरडगाव येथील टुरिस्ट मार्फत श्रीगांद्यातील काष्टी येथील पुष्पा मोहन भोसले, संगिता चंद्रशेखर पाचपुते, सुशिलाबाई वसंतराव वाबळे, हेमा विलास जाधव, नंदा अरुणराव भोसले व आणखी 5 महिला अशा 10 महिला व त्यांचे एकमेकांचे नातेवाईक हे केदारनाथ-बद्रिनाथ देवदर्शनासाठी 15 जूनपासून गेले होते, तसेच 8 जुलैला परत येणार होते.
दरम्यान 29 जुन रोजी देवदर्शन झाल्यानंतर डोंगरावरून परत खाली येतांना या गृप मधील 9 महिला पायी येत होत्या, तर पुष्पा भोसले व रामा सांळुखे व अन्य 9 जण एका वाहनाने खाली येत होते. केदारनाथ यात्रेचा मुख्य थांबा असणार्या मुकटिया येथे डोंगराच्या माथ्यावरून कोसळलेल्या ढिगार्याखाली या भाविकांचे वाहन सापडले. या अपघातात वाहनातील 10 जण जखमी झाले, तर एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. जखमींपैकी पाच महाराष्ट्रातील नगर, तीन बिहारमधील पाटणा, एक स्थानिक रहिवासी आणि दोन नेपाळ मधील आहेत. जखमींमध्ये एका 12 वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.
जखमी प्रवाशांची यादी
कृष्णा भाले (वय 12, रा.नगर), ज्योती बाळासाहेब काळे (वय 40, रा. नगर), कल्पना रंगनाथ काळे (वय 59, रा. कर्जत, नगर), राम साळुंके (वय 38, हिरडगाव ता. श्रीगोंदा जिल्हा नगर), गौतम कुमार (वय 24, रा. पाटणा, बिहार) शिवकुमार (वय 21, रा. पाटणा, बिहार), अंकित शर्मा (वय 21. रा.बिहार), पलामन (वय 30, रा.नेपाळ) टिकाराम (वय 32, रा. नेपाळ), रमेशसिंग सिंग (वय 36, रा.बदासू रुद्रप्रयाग) यांचा समावेश आहे.
Tags :
1073
10