पाथर्डी-जयदत्त जायभाये लाखो मुलांमधून नॅशनल डिफेंस अकॅडमी(NDA) देश सेवेसाठी निवड
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
दत्त मंदिरात अभ्यास करत अकोला(हनुमान वस्ती) येथील जयदत्त जायभाये घेतली यशाची उत्तुंग गगन भरारी - लाखो मुलांमधून नॅशनल डिफेंस अकॅडमी(NDA), खडकवासला, पुणे येथे देश सेवेसाठी निवड*_
_अकोला(हनुमान वस्ती) तालुका-पाथर्डी, जिल्हा-अहमदनगर येथील एडवोकेट नामदेव जायभाये यांचे सुपुत्र जयदत्त जायभाये याची नॅशनल डिफेन्स अकॅडमी(NDA) खडकवासला, पुणे येथे पहिल्याच प्रयत्नात निवड झाली असून तीन वर्षाचा सैन्य अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर देश सेवा करण्याची सर्वोत्तम संधी त्याला प्राप्त होणार असून तो भारतीय सैन्यात उच्चपदस्थ अधिकारी होऊन देश सेवेला समर्पित सेवा देणार आहे._
_जयदत्तचे वडील व्यवसायाने वकील असले तरी त्यांच्यामध्ये असलेल्या भक्ती व समाजसेवेच्या वृत्तीमुळे ते ग्रामीण भागातील आपल्या मूळगावी राहत असून जयदत्तने खेडेगावामध्ये दत्त मंदिरात बसून अभ्यास करत हे उतुंग यश संपादन केले आहे. मनात प्रबळ इच्छाशक्ती, देश सेवेची आवड व त्याला सातत्यपूर्ण प्रयत्नाची जोड दिल्यास मोठ्यात मोठे ध्येय आपण सहज गाठु शकतो याचीच प्रचिती जयदत्त जायभाये याच्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी मधील निवडीवरून येते. त्याच्या या निवडीबद्दल सर्व स्तरावरून त्याच्यावर अभिनंदनचा व कौतुकाचा वर्षाव होत असून जय दत्तला देश सेवेला समर्पित पुढील आयुष्य करता भरभरून हार्दिक शुभेच्छा
जयदत्त जायभाये याची नॅशनल डिफेन्स अकॅडमी(NDA) खडकवासला पुणे येथे लाखो मुलां मधून निवड होऊन ९ सप्टेंबर रोजी देशसेवेला समर्पित आयुष्याची तो सुरुवात करत आहे.. या उच्चतम कार्यासाठी पाथर्डी तालुक्यातून शुभेच्छाचा वर्षाव जयदत्तला हृदयपूर्वक खूप खूप शुभेच्छा...!!!