देशसेवा ही सर्वोच्च सेवा आहे.- प्रा.राजकुमार घुले
पाथर्डी- प्रतिनिधी
देशसेवा ही सर्वोच्च कर्तव्याची भावना असून सैनिकांमुळेच आपण आपल्या घरात सुरक्षित असतो. त्यांच्या कर्तव्यामुळेच आपले अस्तित्व अबाधित असते. वैयक्तिक संपत्ती कितीही असेल व देश सुरक्षित नसेल तर त्या संपत्तीचा उपभोग कोणालाही घेता येणार नाही. असे विचार प्रा.डॉ.राजकुमार घुले यांनी व्यक्त केले. मौजे शेकटे येथील हनुमान यात्रेनिमित्त गावातील सर्व सैनिकांचा सत्कार करण्यात आला. पुढे प्रत्येक वर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व गावाचे नाव उज्ज्वल करणार्या भूमिपुत्रांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एकोणावीस सैनिकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पोपटराव घुले गुरूजी यांनी केले तर आभार प्रा. महादेव घुलेसर यांनी मानले. यावेळी कालीदास घुले, डॉ. अशोक घुले, घुले संपत घुले, शिवाजीराव घुले, रामनाथ घुले, विष्णू घुले, एकनाथ शेटे, आजिनाथ घुले, मल्हारी घुले, भगवान घुले, बुवासाहेब घुले, गोरक्ष घुले,रामराव घुले, जिजाबा घुले, विठ्ठल साबळे, भागवत साबळे, रवींद्र साबळे, पांडुरंग फुंदे, जालिंदर फुंदे, म्हतारदेव घुले,सोमनाथ घुले, बाबुराव घुले, विठ्ठल घुले, शेषराव केदार, अशोक बिडवे आदींसह गावातील महिला भगिनींसह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.