कंटेनर-रिक्षाची धडक,दोन विद्यार्थिनींसह सहा जणांचे जागीच निधन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द परिसरात सदर घटना घडली. या अपघातात दोन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी, दोन महिला व दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. ॲपे रिक्षा मधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. समजलेली अधिक माहिती अशी : डाऊच खुर्द परिसरामधील झगडेफाट्यावरून ॲपे रिक्षा पॅसेंजर घेऊन कोपरगावकडे चालली होती.
यात दोन विद्यार्थिनींसह सहा जणांचे जागीच निधन झाले. ही धडक इतकी जोराची होती की, अॅपे रिक्षा पूर्ण चक्काचुर झाली.
पगारे वस्ती जवळ सदर रिक्षा आली. याच वेळी कोपरगावरून येत असलेल्या कंटेनरने रिक्षाला जोरात धडक दिली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. या कंटेनरने दोन मोटरसायकल स्वारांना देखील चिरडले आहे.
ते देखील गंभीर जखमी झाल्याचे समजते. दरम्यान या घटनेनंतर परिसरात गर्दी जमली होती. नागरिकांनी त्वरित त्याठिकाणी मदतकार्य सुरु केले होते.