महाराष्ट्र
प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा!
By Admin
प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा!
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
याबाबत अधिक माहिती अशी की, शेवगाव (जि.अहमदनगर) येथील इलेक्ट्रिकचे खासगी काम करणारे देविदास जाधव यांना दोन पत्नी आहेत. पहिल्या पत्नीला एक विवाहित मुलीसह एक मुलगा, मुलगी असे तीन अपत्य आहेत. दुसरी पत्नी सुरेखा जाधवची हीची ओळख सोशल मीडियावरील इंस्टाग्रामवरुन यवतमाळ जिल्ह्यातील आशिष विजय राऊत याच्यासोबत झाली. त्यानंतर हळूहळू दोघांमध्ये चँटींग सुरू झाले. त्यानंतर या ओळखीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. मग त्यांचे सतत फोनवर बोलने सुरू झाल्याने पतीला याची कुणकुण लागली होती. सुरूवातीला तिच्या नवऱ्याने सुरेखाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही.
यावरुन त्यांच्यामध्ये खटके उडायला लागले, सुरेखाने तिच्या प्रियकराला पतीकडून होणारा ञास आता असह्य होत असल्याचे सांगून, दोघांकडून पतीला कायमचे संपवण्याचा कट रचण्यात आला. त्यानुसार प्रियकर आशिष राऊत आणि त्याचा मिञ संगित देवकर्ते हे शेवगावला आले. सुरेखाच्या घरी रात्री पोहचत देविदास झोपेत असतानाच त्याच्या डोक्याला राँडने हल्ला करुन त्याचा खून केला. त्यानंतर देविदासचा मृतदेह संगित देवकर्ते यांच्या मारुती सुझुकी कारमध्ये (क्र. एमएच १२ जीएफ१५२७) टाकून थेरगाव जवळील हर्षी शिवारातील आणून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
परंतु, तो अर्धवट जळला होता. दरम्यान गावातील शेतकरीसह ग्रामस्थ सकाळच्या वेळी माँर्निग वाँकला आल्यावर त्यांना जळालेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिसला. त्यांनी याची माहिती पाचोड पोलीसांना कळविली. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे उपनिरीक्षक सुरेश माळीसह सहकार्यासमवेत घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. दरम्यान घटनास्थळी पिशवीत पाण्याची बाटली, बाजूला बरमुडा चड्डी सापडून आली. तसेच मयताच्या पायावर पांढरे कोडचे चट्टे दिसून आले. याआधारे पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत शेवगाव गाठून तपास लावला असता, तो मृतदेह पाहून राजेंद्र जाधव यांचा असल्याचे त्यांच्या पहिल्या पत्नी रेखाने सांगितले. विशेष म्हणजे त्यांची दुसरी पत्नी सुरेखा आहे. तिचा फोन नाँटरीचेबल लागत असून, ती फरार झाल्याचे समजले.
पोलिसांना तिच्यावर संशय येऊन तिच्या फोन नंबरच्या लोकेशन आधारे शोध काढला असता, ती नागपूर येथे असल्याचे समजले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिकडे जाऊन सुरेखा जाधव प्रियकर, आशिष राऊत या दोघांना ताब्यात घेऊन पोलिस खाक्या दाखवत तिने प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याचे कबूल केले. जिल्हा पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया’ पैठणचे प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी जयदत्त भवर याँनी स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोड पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक केले.
साडीची बँग आणि पाणी बाँलटलवरुन ओळख पटवण्यात यश
मयत देविदास जाधव यांच्या मृतदेहाजवळ साडी सेंटर नावाची कँरीबँग आणि पाणी बाँटलवर शेवगाव नावाचा उल्लेख असल्याने पोलिसांनी हा मृतदेह शेवगाव तालुक्यातील असावा या दृष्टीने त्यांनी तपास सुरू केला. हा मृतदेह बघून मयताच्या पहिल्या पत्नीने रेखाबाई हिने मृतदेह बघून पती देविदास असल्याचे पोलीसांना सांगितले.
ही घटना घडल्यानंतर तीन दिवसांतच पोलीसांच्या हाताला लागलेल्या धागेदोऱ्यांच्या सहाय्याने या रहस्यमय खुनाचा उलगडा लावण्यात यश आले आहे. देविदास रामभाऊ जाधव (वय – ४२) रा.शेवगाव ता.जि.अहमदनगर असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर पत्नी सुरेखा देविदास जाधव (वय – २५) प्रियकर आशिष विजय राऊत (वय-२६) आणि त्याचा मिञ संगित शामराव देवकर्ते (वय -२७) दोन्ही (रा.सावळी सदोबा ता.आर्णी जि.यवतमाळ) अशी आरोपींची नाव आहे.
थेरगाव शिवारात बुधवारी (दि.१८) पहाटे एका अनोळखी व्यक्तीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली होती.
स्थानिक गुन्हे शाखा आणि पाचोड पोलिसांनी धागेदोऱ्यांच्या मदतीने तातडीने तपासाचे चक्र फिरवली. यातील आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलीसांनी अखेर यश मिळविले आहे. आरोपी मारेकरी हा इतर कोणी नसून, प्रेमात अडसर ठरणाऱ्या पत्नीनेच तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पाचोड (ता.पैठण) पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पत्नी आणि तिच्या प्रियकरासह तिघांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान आरोपींना पोलिसांनी शनिवारी (दि.२१) पैठणच्या न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
Tags :
8253
10