कायनेटीक कंपनीच्या आवारात भीषण आग
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर-दौंड रोडवरील कायनेटीक कंपनीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत असलेल्या भंगाराला आग लागली
दरम्यान महापालिकेच्या अग्निशमन दलाने ही आग अटोक्यात आणली. यामध्ये मोठे नुकसान झाले आहे. दौंड रोडवरील कायनेटीक कंपनीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत कंपनीतील भंगार साहित्य टाकलेले आहे.
यामध्ये प्लॅस्टिक व इतर साहित्यांचा समावेश आहे. याच साहित्याला आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागली. याची माहिती महापालिका अग्निशमन विभागाल देण्यात आली.
पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाने दोन गाड्या पाणी शिंपडले. आगीमध्ये कंपनीच्या साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
आज दुपारी अहमदनगर-दौंड रोडवरील कायनेटीक कंपनीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत असलेल्या भंगाराला आग लागली. यावेळी परिसरात आगीचे लोळ पसरले होते.