प्राध्यापक विजय देशमुख यांना नॅशनल मास्टर गेम्स मध्ये दोन सुवर्णपदक
पाथर्डी- प्रतिनिधी
त्रिवेंद्रम, केरळ या ठिकाणी नुकत्याच झालेल्या चौथ्या नॅशनल मास्टर गेम्स स्पर्धेत बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. विजय देशमुख यांनी वेटलिफ्टिंग स्पर्धेत ९६ किलो वजन गटात एकूण १७५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले तर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत १०५ किलो वजन गटात एकूण ४३२.५ किलो वजन उचलून दुसरे सुवर्णपदक पटकावले.
या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांनी त्यांचे अभिनंदन केले.