पाथर्डी- आ.निलेश लंके यांनी स्वतः कोरडगाव चौकात उभा राहून रस्त्यावरील वाहतूक कोंडी केली खुली
पाथर्डी - प्रतिनिधी
आज पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी मोहटादेवी कडे जाणाऱ्या वाहतूक कोंडीला खुले करून देण्यासाठी स्वतः कोरडगाव चौकात रस्त्यावर उभा राहून वाहतूक कोंडी खोली करून देण्याचा प्रयत्न केला वास्तविक कोरोना नंतर मोठ्या प्रमाणावर मोहटादेवी गडावर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन देवस्थान व पोलीस प्रशासनाने या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त वाहतूक नियंत्रण यंत्रणा उभारणी आवश्यक होते परंतु वाहनचालक व रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमणे यामुळे महिला दूर वाहतूक कोंडी होत असून यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे अर्थात मतदारसंघात अगदी रस्त्यापासून ते सामान्य कार्यकर्त्यांच्या अनेक प्रश्नावर केवळ संताप व्यक्त करण्यापलीकडे काहीही हातात राहिले नाही यालाच एक मार्मिक व अनोखे उत्तर म्हणून की काय पारनेरचे लोकप्रिय आमदार निलेशजी लंके साहेब यांनी आज कोरडगाव चौकात अडकलेल्या वाहतुकीला खुले करून देण्यासाठी स्वतः रस्त्यावर उतरून वाहतूक खुली करून दिली यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती मात्र लंकेच्या या भूमिकेची नागरिकांतून प्रशंसा केली जात आहे