Breaking- 'या' कट्टर शिवसैनिकाची आत्महत्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शिरढोण (ता. नगर) शिवारात अंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह शुक्रवारी (ता. 25) सकाळी निदर्शनास आला. तो सुदाम रामदास वाघ (वय 45) यांचा असल्याचे समोर आले.
अहमदनगरमधून एक धक्कादायक वृत्त आले आहे. नगर तालुक्यातील शिरढोण येथील शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते सुदाम रामदास वाघ (वय 45) यांनी आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.
त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घरगुती वादातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. नगर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती नगर तालुका पोलिसांना देण्यात आली. नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.
पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाघ यांनी आत्महत्या का केली, याचा तपास पोलिस करत आहेत. प्राथमिक चौकशीत या मागे घरगुती वादाचे कारण असल्याचे पुढे आले आहे.
सुदाम वाघ हे कट्टर शिवसेना कार्यकर्ते होते. परिसरातील राजकारणातही ते सक्रिय होते. त्यामुळे सर्व शक्यता तपासून पोलिस तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.