पाथर्डी तालुक्यातील 'या' गावात शेळ्यांची चोरी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथे शेळ्यांची चोरी झाली.ही घटना १२ ते १३ मे दरम्यान घडली.रामदास किसन सातपुते यांच्या शेडमधील 3 शेळ्या चोरट्यानी चोरून नेल्या.३५ हजार रुपये किमतीच्या शेळ्या होत्या.सातपुते यांच्या फिर्यादीनुसार पाथर्डी पोलिस ठाण्यात भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस ना. गर्जै करत आहेत.