महाराष्ट्र
चंदनासह 21 लाखाचा मुद्देमाल जप्त; शेवगाव तालुक्यातील दोन व्यक्तीस अटक
By Admin
चंदनासह 21 लाखाचा मुद्देमाल जप्त; शेवगाव तालुक्यातील दोन व्यक्तीस अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या मोहिमेमुळे चर्चेत असणाऱ्या अतिरिक्त पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांनी मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावर असलेल्या महाजनवाडी येथे छापा मारून एका घरात साठून ठेवलेले चंदन व त्यासाठीचे साहित्य असा एकूण वीस लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमालासह एकास ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी ११ जणांविरोधात शनिवारी (ता. २३) नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
बीड तालुक्यातील महाजनवाडी येथील अशोक रामहारी घरत याने बेकायदेशीररीत्या काही जणांच्या मदतीने शिवारातील शेतात चंदनाची झाडे चोरून तोडून त्यातील गाभा चोरट्या मार्गाने विक्री करण्यासाठी घरात आणून ठेवला होता, या बाबतची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांना शनिवारी सायंकाळी मिळाली होती. या माहितीच्या आधारे अतिरिक्त पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन शनिवारी रात्री छापा मारला. यावेळी चंदनाची खोडे तासीत असणारा एक जण जागीच मिळून आला. त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले, अशोक रामहारी घरत (रा. महाजनवडी, ता. बीड) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या घराची झडती घेतली असता ४९९ किलो चंदनाचा तासलेला गाभा, लाकडे, वजन काटा, वाकस, कुऱ्हाडी व बोलेरो पिकअप असा एकूण २० लाख ७२ हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
पोलिस हवालदार बालाजी शेषेराव दराडे यांच्या तक्रारीवरून एकूण ११ जणांविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही धाडशी कारवाई पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलिस अधिक्षका कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, पोलिस बाबासाहेब बांगर, बालाजी दराडे, अमजद सय्यद, राजू वंजारे, रामहरी भांडाने, संजय टूले, शिवाजी कागदे, दीपक जावळे व महिला पोलिस नाईक अशा चोरे यांनी केली.
तीन कंपनी मालकांचाही समावेश
यात गुन्हा दाखल झालेल्यांत ज्यांना चंदन पुरवायचे होते, त्या तीन कंपनीच्या मालकांचाही समावेश आहे. यात कुंटन शेख आणि शमशोभाई चावला (रा. सेंधवा, मध्य प्रदेश), अमितभाई (रा. हैदराबाद) यांचा समावेश आहे. तसेच गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अशोक रामहरी घरत (रा. महाजनवाडी), अतिक शेख, शेख जावेद (दोघेही रा. नेकनूर), मारुती वाघमोडे, कल्याण वाघमोडे (दोघेही रा. शेवगाव, जि. नगर), विष्णू बांगर (साक्षाळ पिंपरी), विलास पवार (पात्रुड, ता. भूम, जि. उस्मानाबाद), दत्ता गर्जे (रा. महासांगवी, ता. पाटोदा) यांचाही समावेश आहे.
Tags :
827
10