जिल्हा बॅकेत झालेल्या गोळीबारात एकाचा जागेवर मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोडवर नगरपालिकेजवळ असणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेमध्ये एका सिक्युरिटी गार्डकडून रायफल मधून गोळीबार झाला. या गोळीबारात अजित जोशी या जिल्हा सहकारी बँकेच्या ग्राहकाचा जागेवर मृत्यू झाला आहे.
आज शनिवार 30 जुलै 2022 रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास ही भयानक घटना घडली.या घटनेची अधिक माहिती अशी की,अशोक कारखाना-अशोक बँक चा सिक्युरिटी गार्ड दशरथ कारभारी पुजारी ,वय-५८ हा बँकेच्या कामानिमित्त जिल्हा सहकारी बँकेच्या शाखेमध्ये त्याच्या सहकाऱ्यांसह आला होता.त्यावेळी त्याच्या हातात असलेल्या रायफल मधून बॅंकेत आलेले ग्राहक श्री.अजित जोशी,राहणार-श्रीरामपूर शहर यांच्या डोक्यामध्ये रायफलमधून सुटलेली गोळी घुसली.त्यामुळे जोशी यांच्या डोक्याचा अर्धा भाग शरीरापासून वेगळा होऊन त्यांचा जागेवर मृत्यू झाला.
यावेळी बघ्यांची प्रचंड मोठी गर्दी होऊन छत्रपती शिवाजी महाराज रोडवर ट्रॅफिक जाम झाली होती.घटनेची माहिती समजतात श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती स्वाती भोर,श्रीरामपूरचे डीवाय एसपी श्री.संदीप मिटके व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.सानप हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व पुढील कारवाई चालू केली आहे.