महाराष्ट्र
पोटच्या मुलांना पैशाच्या गरजेपोटी विक्री केल्याची बाब दुर्दैवी', आदिवासी मंत्री डॉ. गावित यांचे चौकशीचे आदेश
By Admin
पोटच्या मुलांना पैशाच्या गरजेपोटी विक्री केल्याची बाब दुर्दैवी', आदिवासी मंत्री डॉ. गावित यांचे चौकशीचे आदेश
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नाशिक (Nashik) आणि अहमदनगर (Ahmednagar) भागातील आदिवासी पालकांनी आपल्या पोटच्या मुलांना पैशाच्या गरजेपोटी विकल्याच्या घटनेनंतर आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी सदरचा प्रकार दुर्दैवी असुन अशा प्रकारच्या घटना या पुढे घडणार नाही, याबाबत आपण स्वत काळजी घेणार असल्याचे सांगितले.
या प्रकरणात चौकशी करुन दोषींवर कारवाईचे संकेत देत आदिवासी विकास मंत्र्यांनी कातकरी समाजातील वंचीतांसाठी विभागाकडुन नियोजन सुरु असुन डिसेंबर पर्यत त्यांची अंमलबजावणी देखील केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
इगतपुरी येथील पाच अल्पवयीन मुलांकडून पारनेर तालुक्यात वेठबिगारी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गरिबीचा आणि कमी वयाचा गैरफायदा घेऊन वेठबिगारी करून घेतल्याबाबतची फिर्याद संगमनेर पोलिसात दाखल झाली होती. इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथील बाबुराव सिताराम भोईर यांनी संगमनेर पोलिसात फिर्याद दिली. त्यानंतर हे प्रकरण पुढे आले आल्यानंतर सर्वच स्तरातून या प्रकरणाबाबत आवाज उठविला जात आहे. मागील तीन वर्षापासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. ज्या अल्पवयीन मुलांना पारनेरमध्ये पाठवण्यात आले होते. त्यांच्याकडून मेंढपाळीचा व्यवसाय करून घेतला जात होता.
दरम्यान या प्रकरणी आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी ते म्हणाले कि, इगतपुरी येथील वेठबिगारीचा प्रकार दुर्दैवी असुन अशा प्रकारच्या घटना या पुढे घडणार नाही, याबाबत आपण स्वत काळजी घेणार असल्याचे सांगितले. या प्रकरणात चौकशी करुन दोषींवर कारवाईचे संकेत देत आदिवासी विकास मंत्र्यांनी कातकरी समाजातील वंचीतांसाठी विभागाकडुन नियोजन सुरु असुन डिसेंबर पर्यत त्यांची अंमलबजावणी देखील केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
नेमकी घटना काय?
काही दिवसांपूर्वी इगतपुरी येथील कातकरी समाजातील मुलांच्या वेठ बिगारीबाबतचा प्रश्न पुढे आला होता. प्रत्येकी पाच हजार रुपये आणि एका मेंढीच्या बदल्यात इगतपुरी तालुक्यातील कातकरी पाड्यांवरच्या मुलांची खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गौरी आगिवले या बालिकेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या मृत्यूचा तपास सुरु असताना मुलांच्या विक्री संदर्भातील हे रॅकेट उघड झाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील घारगाव, संगमनेर तालुका आणि पारनेर पोलीस ठाण्यात वेगवेगळे तीन गुन्हे दाखल आहेत. एका सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्याला याबाबत माहिती मिळाली होती. त्यांनी याबाबत चौकशी केली असता या गुन्ह्यातील मुलांबाबत त्यांना माहिती मिळाली होती. दरम्यान, या गुन्ह्यात मोठे रॅकेट काम करत असल्याचा संशय पोलिसांना असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Tags :
1517
10