महाराष्ट्र
पाथर्डी- उबेर गाडी चोरी करणाऱ्या 'या' गावातील आरोपीस पोलिसांकडून अटक!
By Admin
पाथर्डी- उबेर गाडी चोरी करणाऱ्या 'या' गावातील आरोपीस पोलिसांकडून अटक!
नगर सिटीझन live टीम प्रतिनिधी
उबेर गाडी बुक करून चालकाची फसवून कार ची चोरी करणाऱ्या आरोपीस शिरूर पोलिस स्टेशन च्या तपास पथकाने अवघ्या काही तासात अटक केली आहे.
या प्रकरणी सागर नवनाथ निकम (रा. मढी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, तर या प्रकरणी नागेश तांबरे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी नागेश तांबारे उबेर चालक म्हणून पुणे येथे काम करतो. फिर्यादी उमेश हा रेल्वे स्टेशन पुणे येथे असताना आरोपी सागर नवनाथ निकम याने रेल्वे स्टेशन, पुणे येथुन फिर्यादीची उबर अॅपद्वारे शिरूर येथे जाण्याकरिता कार बुक केली.
या कारमध्ये बसून कार शिरूर येथे आली असता दिप वाईन्सच्या आरोपीने फिर्यादी यास कार थांबण्यास सांगितली तसेच बिअर घेवुन ये व जाताना गाडीचा ए.सी. चालु ठेव असे सांगुन ड्रायव्हर फिर्यादी हा बिअर घेण्याकरिता दिप वाईन्स मध्ये गेला असता आरोपी याने चालु चारचाकी वॅगनआर कार नं. (एम. एच.१२ क्यु. जी. ९५८०) ही घेऊन आरोपी कार नगर बाजुकडे घेऊन पळून गेला. याबाबत फिर्यादी यांनी धाव घेऊन तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून शिरूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्यास सुरूवात करून अज्ञात आरोपीचा उबेर कंपनीकडुन मोबाईल क्रमांक हस्तगत करून प्राप्त मोबाईल क्रमांकावरून तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता आरोपी मढी, ता. पाथर्डी, ता. अहमदनगर येथे असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
यावेळी पोलिसांनी तब्बल दोन दिवस स्थानिक बातमीदारांच्या मदतीने माहिती घेत आरोपीस अटक केली आहे. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे. पोलिसांनी चोरी गेलेली उबेर कार ताब्यात घेतली आहे. हा तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नाथसाहेब जगताप, पोलिस अंमलदार संतोष साळुंखे यांनी केला आहे.
Tags :
1159
10