महाराष्ट्र
Breaking- दहावी बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर 'या' कारणांमुळे विनाअनुदानित शिक्षकाचा बहिष्कार
By Admin
Breaking- दहावी बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर 'या' कारणांमुळे विनाअनुदानित शिक्षकाचा बहिष्कार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
10th-12th : राज्यातील तब्बल सहा हजार अनुदानित शाळेतील शिक्षकांना शंभर टक्के पगार देण्याचे व सेवा संरक्षण देण्याच्या आश्वासनाची आतापर्यंत राज्य सरकारकडून पायमल्ली करण्यात आली आहे. ती आश्वासने अद्यापही पाळली गेली नाहीत. सतत विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत असत, या शाळेतील कार्यरत शिक्षकांनी यंदा दहावी व बारावी पेपर तपासणीवर बहिष्कार घातला आहे. यामुळे निकालावर प्रचंड मोठा परिणाम होणार आहे. तसेच निकाल उशिरा लागल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असे विनाअनुदानित कृती समितीचे अध्यक्ष संजय डावरे यांनी सांगितले. लक्षणीय बाब म्हणजे यासंबंधीचे निवेदन राज्य मंडळाला देण्यात आले आहे.
सध्या देशभरात दहावी आणि बारावीच्या 10th-12th विद्यार्थ्यांची बोर्ड परिक्षा सुरू आहे. मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सध्या सुरू असलेल्या दहावी आणि बारावी परिक्षेतील उत्तरपत्रिका तपासणीवर विनाअनुदानित शिक्षकांनी बहिष्कार टाकला आहे.
दरम्यान, यामागण्यांसाठी विनाअनुदानित शिक्षकांनी विविध टप्प्यांद्वारे आंदोलने केली. दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. मुंबईतील अनेक विभागातील शाळा, महाविद्यालयांमध्ये उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांकडे देण्यात आलेले उत्तरपत्रिकांचे गठ्ठे जसेच्या तसे आहेत. तसेच उत्तरपत्रिकांची तपासणी झालीच नसल्याची माहिती विनाअनुदानित कृती समितीचे अध्यक्ष संजय डावरे यांनी दिली आहे.
तर शिक्षक सहकार्य करणार नाही त्यांनी म्हटले की, शालेय शिक्षण विभाग जर आमच्या मागण्यांच्या याबाबतीत सकारात्मक नसेल विनाअनुदानित शाळांमधील अनेक शिक्षण उत्तरपत्रिका तपासण्यासाठी हवे असलेले सहकार्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. दहावी आणि बारावीच्या 10th-12th दोन्ही इयत्तांच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे आहे तसेच पडून आहेत. लक्षणीय बाब म्हणजे अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तसेच तपासाविना पडून राहिले आहेत. तसेच निकालाला उशीर झाल्यास त्यासाठी कृती समिती जबाबदार राहणार नाही, असा इशारा शालेय शिक्षण विभाग आणि राज्य मंडळाला विनाअनुदानित कृती समितीने दिला आहे.
Tags :
38119
10