महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे भगवानगडावर
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगड येथे १२ ऑक्टोबर रोजी राज ठाकरे यांचे सुपुत्र व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे दर्शनासाठी येणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांनी दिली.
यापूर्वी मनसेचे प्रमुख राज ठाकरे देखील भगवानगडावर भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येऊन गेले आहेत. आता त्यांचे सुपुत्र व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे बुधवारी दुपारी चार वाजता येणार असल्याने मनसे सैनिकांची मोठी गर्दी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांचा दौरा होत असल्याने या दौऱ्याला विशेष राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. भालगाव पंचायत समिती गण माजी सदस्य देविदास खेडकर यांनी खरवंडी येथे ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे. श्रीक्षेत्र भगवानगड येथे अमित ठाकरे दर्शनासाठी येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सवाचे वातावरण आहे. या दौऱ्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसे कार्यकर्त्यांना मोठे बळ मिळणार आहे.