जिल्हास्तरीय युवक महोत्सवात बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे यश
पाथर्डी- प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वररंग २०२२ या जिल्हास्तरीय युवक महोत्सवात येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
अहमदनगर जिल्ह्यातील चाळीस महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी झाले होते. वैयक्तिक नृत्य स्पर्धेत साक्षी शिंदे हिने तृतीय क्रमांक पटकावला. समूह गायन, नृत्य व मेहंदी या स्पर्धेतही महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवला. तर मूक अभिनयात उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले.
या यशाबद्दल पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड, उपाध्यक्ष सुरेशराव आव्हाड, प्राचार्य.डॉ.जी.पी.ढाकणे यांनी यशस्वी विद्यार्थी कलाकारांचा सन्मान केला.
सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक डोळस, डॉ. वैशाली आहेर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अर्जुन केरकळ, प्रा. विजयकुमार म्हस्के, प्रा. अनिल म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.