महाराष्ट्र
आई'च्या खुनानंतर 'हे' पाथर्डी तालुक्यातील 'हे' चौघे घेणार होते आणखी एकाचा बळी
By Admin
आई'च्या खुनानंतर पाथर्डी तालुक्यातील 'हे' चौघे घेणार होते आणखी एकाचा बळी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
प्रेमात अडसर ठरणाऱ्या सुशीला पवार या आईला मुलीने प्रियकरासह मैत्रीण व प्रियकराच्या मित्राच्या मदतीने संपविले होते. हे चारही आरोपी सुशीला पवार यांचा खून पचविल्यानंतर सुशीला यांची मैत्रीण आणि आरोपींमधील १४ वर्षाच्या मुलीच्या नातेवाईक महिलेचाही तीन दिवसात असाच काटा काढणार होते, अशी धक्कादायक माहिती माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
चेहऱ्यावर अपराधीपणाचे कुठलेही भाव न दाखविता पोलिसांच्या प्रश्नाला बेधडक उत्तरे देणारी ही तरुणाई कोणत्या वळणार जात आहे ? असा अंतर्मूख करणारा प्रश्न पोलिसांना पडला आहे.
बाळापूर फाटा शिवारात ९ मे रोजी सुशीला पवार यांचा मृतदेह आढळला होता. प्रेमात अडसर ठरत असल्याने पोटच्या मुलीनेच प्रियकर, अल्पवयीन मैत्रीण व प्रियकराच्या मदतीने त्यांचा गळा चिरल्याचे समोर आले होते. या प्रकरणी दोन्ही मुली अल्पवयीन असल्याने त्यांना रिमांड होममध्ये ठेवले असून आरोपी दीपक राजु बताडे (२४, रा. पाथर्डी, जि. अहमदनगर, ह.मु. शिवाजीनगर, रेणुकानगर, औरंगाबाद) आणि सुनील ऊर्फ राहुल संजय मेहर (२०, रा. गल्ली नं.१, इंदिरानगर, गारखेडा परिसर) हे पोलिस कोठडीत आहेत. धक्कादायक म्हणजे, त्यांनी ८ मे 'मदर्स डे'च्या दिवशीच आईचा काटा काढला होता, अशी माहिती पोलिस निरीक्षक देविदास गात यांनी दिली.
थाप मारून घेतले बोलावून
आईचा काटा काढण्याचे ठरल्यानंतर आरोपींनी दुसऱ्याच्या नावाने सिम कार्ड खरेदी केले. ८ मे रोजी दुपारी सुशीला पवार यांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराला घरीच मारहाण केली होती. त्याच रात्री काटा काढण्याचा कट रचल्यावर मुलगी, तिची मैत्रीण, प्रियकर दीपक बताडे आणि त्याचा मित्र सुनील मेहर हे चौघे शेतात गेले. एवढ्या रात्री आईला शेतात बोलावून घेण्यासाठी त्यांनी मुलीच्या मैत्रिणीला दुसऱ्याच्या नावावरील सिमकार्डवरून सुशील पवार यांना फोन करायला लावला. ती फोनवर म्हणाली, तुमची मुलगी व तिचा प्रियकर दीपक हे तुम्ही बटाईने घेतलेल्या शेतात आहेत. त्यांनी मला सोबत आणले होते. त्यांच्यापासून दूर येऊन मी तुम्हाला ही माहिती देत आहे. तुम्ही लवकर शेतात या, अशी थाप मारून तिने सुशीला यांना शेतात बोलावून घेतले.
थोडा जीव आहे म्हणत लेकीने पुन्हा चाकू खुपसला
मुलीच्या मैत्रिणीवर विश्वास ठेवून सुशीला पवार या लगेचच स्कुटीवरून शेतात गेल्या. रात्री ११ वाजेच्या सुमारास त्या तेथे पोचल्या. काही अंतरावरच उभ्या असलेल्या त्या १४ वर्षीय मुलीने त्यांना थांबविले. त्यांना पुन्हा सगळी माहिती दिली. सुशीला या रागारागात मुलीकडे गेल्या. १४ वर्षांची मैत्रिणही सोबत होतीच. तेथे गेल्यावर सुशीला यांनी मुलीच्या कानशिलात लगावली. त्या तिचा प्रियकर दिपकलाही मारणार केली, तेवढ्यात त्याने सुशीला यांच्या गळ्यावर चाकूने वार केला. एका घावात त्या कोसळल्या. त्यानंतर ८ वार केले. त्यानंतर चौघेही तेथून निघाले. तेव्हा आईमध्ये अजून जीव आहे, असे लेकीच्या लक्षात आले. तिने माघारी जाऊन पुन्हा चाकूने वार केला. त्यानंतर ते चौघेही तेथून निघून गेले, असे तपासात समोर आले आहे.
खून करण्यासाठी वापरलेला चाकू जप्त
सुशीला पवार यांचा खून करण्यासाठी वापरलेला चाकू चिकलठाणा पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींनी तो चाकू घटनास्थळापासून काही अंतरावरच फेकून दिला होता. विशेष म्हणजे, ज्याच्याकडून हा चाकू खरेदी केला होता त्याचाही पोलिसांनी जबाब नोंदविला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक देविदास गात यांनी दिली.
Tags :
18122
10