स्वप्न वासवदत्ता' संगीत नाटकाचा शानदार प्रयोग
पाथर्डी प्रतिनिधी
अप्रतिम अभिनय, उत्कृष्ट नेपथ्य, सुंदर भव्य रंगमंच प्रकाश योजना व हजारो रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत मुग्धा पोतदार निर्मित स्वप्न वासवदत्ता या बहारदार संगीत नाटकाचा प्रयोग रंगला.
श्री तिलोक जैन विद्यालयाच्या प्रांगणात हजारो नाट्य प्रेमी रसिकांनी या नाटकाचा मनमुराद आनंद लुटला. यावेळी श्री तिलोक जैन प्रसारक मंडळाचे सचिव सतिश गुगळे, विश्वस्त सुरेश कुचेरिया, राजेंद्र मुथ्था, धरमचंद गुगळे, चांदमल देसर्डा, डॉ. सचिन गांधी, अभय भंडारी, घेवरचंद भंडारी, डॉ.ललित गुगळे, सुरेश चोरडिया आदींसह शहरातील नाट्य रसिक उपस्थित होते.
दोन हजार वर्षापूर्वी कवी भास यांनी रचना केलेल्या पौराणिक जैन राजकुमारी वासवदत्ता यांच्या जीवनावरील संस्कृत काव्यावर आधारित स्वप्न वासवदत्ता या भव्य दिव्य संगीत नृत्य नाटकाची निर्मिती झाली. संस्थेचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया यांच्या संकल्पनेतून मेधा फाउंडेशन व कथा बिरादरीने हे नाटक सादर केले. या संगीत नाटिकेच्या रूपाने अनेक वर्षानंतर पाथर्डीकरांना एका उत्कृष्ट संगीत नाटकाची मेजवानी मिळाली. उत्कृष्ट नेपथ्य, वेशभूषा, सुंदर संगीत, बहारदार सादरीकरण, अप्रतिम अभिनय, दिग्दर्शन व सुंदर प्रकाश योजना व सुंदर रंगमंच तसेच श्री तिलोक परिवाराने घेतलेली मेहनत यामुळे नाट्य रसिकांना स्वर्गीय आनंद मिळाला. या नाटकाची निर्मिती व निर्देशन मुग्धा पोतदार- पाठक यांनी केले असून नाट्यरूपांतर डॉ. सुनिल देवधर तर संगीत निखिल महामुनी व अमोल कुलकर्णी यांचे लाभले आहे. या नाटिकेत कुणाल फडके, पूजा मेहता, ओंकार शिंदे, मुग्धा पोतदार या प्रमुख कलाकारांसह इतर कलाकारांच्या दमदार अभिनयाने रसिकांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल कटारिया तर आभार विजयकुमार छाजेड यांनी मानले.