वंचितच्या कार्यकर्त्यावर गावगुंडाचा हल्ला बातमी समजताच प्रा किसन चव्हाण आपल्या सहकाऱ्यांसह पोलीस स्टेशनला तात्काळ हजर
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील आगासखांड येथील वंचित बहुजन आघाडीचे रामा रघुनाथ रंधवे या तरुणावर गावातीलच एका गावगुंडाने काल गजा सारख्या तीक्ष्ण हत्याराने जीवघेना हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गज इतका तीक्ष्ण होता की तो दंडा मध्ये आरपार गेला
ही बातमी समजताच वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण हे वंचितचे पाथर्डी तालुका अध्यक्ष रवींद्र उर्फ भोरू म्हस्के,जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के,शेवगाव तालुका अध्यक्ष प्यारेलालभाई शेख,महिला आघाडीच्या अध्यक्षा सुनिताताई जाधव, तालुका अध्यक्षा रोहिनीताई ठोंबे,तालुका महासचिव संजय कांबळे,नंदुभाऊ कांबळे, शहराध्यक्ष इरफानभाई शेख,राजुशेठ पठाण,दिलावरभाई बागवान सोपान भिंगारे,सुनील जाधव सुरेश जाधव,पप्पू जाधव ,प्रशांत चव्हाण ,किशोर फतपुरे, बाळासाहेब गोसावी,अजय रणदिवे,शरद बिडवे,सागर बिडवे,आदी कार्यकर्त्याना बरोबर घेऊन पोलीस स्टेशनला तात्काळ हजर झाले जखमींची नातेवाईकांची विचारपूस करून त्यांना धीर देत, अहमदनगर च्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मध्ये उपचारासाठी पाठवलेल्या जखमींना मदत व्हावी यासाठी नगरच्या वंचितच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून त्यांनाही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले
पाथर्डी पोलीस निरीक्षक यांच्या बरोबर चर्चा करून हल्ला करणाऱ्या गावगुंडाला तात्काळ अटक करून तुम्ही बंदोबस्त करा अन्यथा आम्हाला त्याचा विचार करावा लागेल असे आवाहन प्रा किसन चव्हाण आणि भोरु म्हस्के यांनी केले