श्री आनंद महाविद्यालयात मेरी माटी मेरा देश अमृत कलश कार्यक्रम संपन्न
पाथर्डी प्रतिनिधी:
श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दि.२५ सप्टेंबर २०२३ रोजी मेरी माटी, मेरा देश अमृत कलश ' हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेषराव पवार होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. इस्माईल शेख यांनी केले. त्याप्रसंगी विद्यार्थ्यांना मेरी मेरी मेरा देश या उपक्रमामध्ये सहभाग होण्यासाठी आवाहन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत आपल्या गावातील मातीचा गौरव होत आहे, त्या प्रसंगी आपण सर्वांनी या ऐतिहासिक अमृत कलश या उपक्रमामध्ये सहभागी होत आहोत. यावेळी महाविद्यायाचे प्राचार्य डॉ. शेषराव पवार, समवेत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. इस्माईल शेख, डॉ. जयश्री खेडकर, सर्व प्राध्यापका सह सर्व विद्यार्थ्यांनी अमृत कलश मध्ये एक एक मूठ माती टाकतांना आपला सेल्फी काढून शासनाच्या लिंकवर अपलोड केला.
या प्रसंगी प्रा. डॉ. विकास गाडे, प्रा. दत्ताराम बांगर, प्रा. डॉ. मुक्तार शेख, डॉ. प्रतीक नागवडे, डॉ. नितीन ढूमने, डॉ. बथूवेल पगारे, प्रा. अनिता पावसे, डॉ. जयश्री खेडकर, डॉ. धीरज भावसार,उमेश कुलकर्णी, दिलीप हंडाळ, राजेंद्र भालेराव, योगेश घोडके, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. इस्माईल शेख व इतर सर्व प्राध्यापक व प्रशासकिय कर्मचारीसह विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जयश्री खेडकर यांनी केले तर प्रा. अनिता पावसे यांनी आभार मानले.