दुचाकीस्वार महिलेने केली तीन धार्मिक स्थळांची विटंबना
By Admin
दुचाकीस्वार महिलेने केली तीन धार्मिक स्थळांची विटंबना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अकोला आणि शेवगाव येथील दंगल शमत असतानाच एका दुचाकीस्वार महिलेने एका मंदिरासह तीन धार्मिक स्थळांची विटंबना करून शहर पेटविण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली.
कार्यतत्पर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेजवरून दुचाकीस्वार महिलेस अटक केली. ही माथेफिरू महिला पोस्ट कार्यालयात नोकरीला आहे, हे विशेष.
सातारा परिसरातील अलोकनगरमधील गट नं. 161 मध्ये असलेल्या रामदूत हनुमान मंदिरात आज शनिवारी सकाळी साडेनउâ वाजेच्या सुमारास अॅक्टिव्हा दुचाकीवर आलेल्या एका महिलेने मंदिरात प्रवेश करून हनुमानाच्या मूर्तीवर तसेच मंदिरात अंडे फेकून विटंबना केली. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर तिने बाजूलाच असलेल्या महादेवाच्या पिंडींवरदेखील अंडे फेकून विटंबना केली. त्यानंतर दुचाकीवरून ती महिला पसार झाली. त्यानंतर याच महिलेने काल्डा कॉर्नरवरील श्रीराम चौक या फलकावरदेखील अंडे फेकून फलकाची विटंबना केली. मंदिरात विटंबना झाल्याचे कळताच अलोकनगर तसेच श्रीराम चौकात तणाव निर्माण झाला. अलोकनगर भागात हनुमान मूर्तीची विटंबना झाल्याचे कळताच शिवसेनेचे उपशहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, विभागप्रमुख नितीन झरे पाटील, दिनेश राजेभोसले, प्रदीप बागुल पाटील, गिरीश कुलकर्णी, चेतन बागुल, गोरक्षनाथ हिंगे, राजुदास वैष्णव, सहिंद सहानी, सोहन इंगळे व अक्षय ढवळे
यांनी तातडीने सातारा पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त शीलवंत नांदेडकर, सातारा पोलीस ठाण्याचे प्रशांत पोतदार, उपनिरीक्षक कल्याण चाबुकस्वार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपासाला सुरुवात केली. श्रीराम चौकातदेखील नामफलकावर अंडे फेकले गेल्याचे समजल्यावर हे पथक काल्डा कॉर्नरवर धडकले. परिसरातील फुटेज ताब्यात घेतले असता अलोकनगर भागातील हनुमान मंदिरात विटंबना करणारी महिलाच या घटनेतही दिसत असल्याचे समोर आले. यावरून पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत दुचाकी क्रमांकावरून महिलेला ताब्यात घेतले. माथेफिरू महिला क्रांतीचौक पोस्ट कार्यालय, कुशलनगरात पोस्टल सहायकपदावर कार्यरत आहे.
9352
10





