अक्षय मिसाळ यांची सहाय्यक अभियंता वर्ग 2 पदी निवड
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील चि.अक्षय पांडुरंग मिसाळ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत सहाय्यक अभियंता वर्ग-2 जलसंपदा विभाग नाशिक येथे या पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच राजेंद्र उदागे, नानासाहेब कंठाळी, मारुती मिसाळ,केशव पवार,राम राऊत, भगवान मिसाळ,अंकुश कंठाळी, सदाशिव कंठाळी, विष्णु वावरे,ज्ञानेश्वर मिसाळ,विवेक वाखुरे,नाना लोखंडे,कानिप मिसाळ आदीं सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
अक्षय यांचे यशाबद्दल विविध स्तरांतून शुभेच्छां चा वर्षाव होत आहे.