महाराष्ट्र
शेतकरी कुटुंबातील मराठा तरुणांना कर्ज मिळणार- ऋषीकेश भालसिंग
By Admin
शेतकरी कुटुंबातील मराठा तरुणांना कर्ज मिळणार- ऋषीकेश भालसिंग
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
आजच्या नवयुवकांनी नोकरी मागे न धावता उद्योजकता अंगी बनवणे खूप गरजेचे असून या दृष्टिकोनातून सरकारचा खूप मोठा प्रयत्न आहे.त्यासाठी अनेक प्रकारच्या योजनांची आखणी देखील सरकारकडून करण्यात येते.कारण आपण नोकऱ्याचा विचार केला तर दरवर्षी उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या खूपच कमी आहेत.
दरवर्षी पदवी घेऊन बाहेर निघणाऱ्या तरुणांची संख्या खूपच जास्त असल्याने बेरोजगाराची समस्या वाढत आहे.
अशा मराठा समाजातील तरुणांना आर्थिक मदत व्हावी व तरुणांमध्ये उद्योजकता रुजावी यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बँक आॕफ इंडियासोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
माराठा उद्योजक तयार व्हावे या दृष्टिकोनातून अण्णासाहेब पाटीला आर्थिक मागास विकास महामंडळातून सातत्याने प्रयत्न केले जात असून महामंडळाने बँक आँफ इंडिया बरोबर करार केले असल्याची माहीती मराठा उद्योजक ऋषिकेश भालसिंग यांनी दिली.
बँक आँफ इंडियाच्या माध्यमातून तरुणांना व्यवसायासाठी कर्जावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिले जाते.मराठा तरुण लाभार्थी कर्जाची मागणी करु शकतात.तसेच या कर्जाला गॕरंटीच्या माध्यमातून कर्ज मागणी प्रस्तावांचा सकारात्मक विचार केला जाणार आहे.जास्तीत जास्त मराठा समाजातील तरुण हा उद्योजक व्हावा याकरीता महामंडळ व राज्य शासन प्रयत्न करणार असल्याचे भालसिंग यांनी माहीती दिली.महामंडळाच्या विविध योजनाचा करार संबंधी परीपञक प्रसिद्ध होणार आहे.व्यवसायाकरीता जे काही कर्ज आवश्यक आहे.त्या संबंधी असणाऱ्या अडचणीवर मात करुन बँकेच्या माध्यमातून महामंडळ योजना तरुणा पर्यत पोहचवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्य शासन अण्णासाहेब विकास महामंडळासाठी सहकार्य करत आहेत.
सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील तरुणांना कर्ज उपलब्ध होणार आहे.असे मराठा उद्योजक सदस्य सदस्य भालसिंग यांनी सांगितले.
Tags :
73579
10