लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 50 व्या गळीत हंगामाचा प्रारंभ
कामगारांना 13 टक्के दिवाळी बोनस देण्याचा निर्णय
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या (sugar factory) 50 व्या गळीत हंगामाचा प्रारंभ श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते झाला.
वेळी भास्करगिरी महाराज यांनी भौतिक सुधारणांसाठी केलेली बौद्धिक कानउघाडणी चर्चेचा विषय ठरली. कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील (Narendra Ghule) अध्यक्षस्थानी होते.
भास्करगिरी महाराज म्हणाले, "मंदिरातला देव पुजायचाच आहे. त्यापेक्षा समाजाकरता उद्योग-कारखाना निर्माण करणार्यांना खरे देव मानले पाहिजे. मठ-मंदिरे-धार्मिक क्षेत्र उभे करणे हे आंतरिक सुख आहे, पण बाह्यसुख मिळवण्याकरिता समाजाला उपयोगी पडतील, अशा वास्तू आणि कारखाने निर्माण करणे गरजेचे आहे.
सामूहिक शक्ती, नेत्यांचे धोरण आणि अध्यात्माची जोड या त्रिवेणी संगमातून भौतिक सुधारणा शक्य आहे". सर्वांच्या प्रयत्नांनी व विचारांनी कारखाना उभारणे आणि टिकवणे ही तारेवरची कसरत आहे. मारुतराव घुले यांनी अथक प्रयत्नाने कारखाना, तसेच शिक्षण संस्था उभ्या केल्याने हा परिसर सुजलाम-सुफलाम झाल्याचेही भास्करगिरी महाराज म्हणाले.
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यातील कामगारांना 13 टक्के दिवाळी बोनस देण्याचा निर्णय या वेळी झाला. संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, नितीन पवार, काकासाहेब नरवडे, काकासाहेब शिंदे, अशोकराव मिसाळ, प्रा. नारायण म्हस्के, पंडित भोसले, भाऊसाहेब कांगुणे, जनार्दन कदम, शिवाजी कोलते, अनिल शेवाळे, रवींद्र मोटे उपस्थित होते.