महाराष्ट्र
1575
10
चरसची विक्रीसाठी आलेल्या सराईतला अटक
By Admin
चरसची विक्रीसाठी आलेल्या सराईतला अटक;24 लाखाचा मुद्देमाल जप्त, अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर येथून पुण्यात अंमली पदार्थीची विक्रीसाठी आलेल्या तसेच एक वर्षापासून फरार असलेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली आहे.
त्याच्याकडून २४ लाखांचा २ किलो चरस आणि इतर साहित्य जप्त केले आहे. उरुळी कांचन परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.
अहमदनगर येथून पुण्यात अंमली पदार्थीची विक्रीसाठी आलेल्या तसेच एक वर्षापासून फरार असलेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली आहे. त्याच्याकडून २४ लाखांचा २ किलो चरस आणि इतर साहित्य जप्त केले आहे. उरुळी कांचन परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.
औरंगजेब पप्पू अन्सारी उर्फ रंगा परदेशी (वय २७ रा. दर्गा दर्या रोड, मुकूंदनगर, अहमदनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
शहरात अमली पदार्थ तस्करी वाढली आहे. यापार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून जोरदार कारवाई सुरू आहे. तर, अंमली पदार्थ विरोधी पथकाला सूचना देण्यात आल्या आहेत. अमली पदार्थ विरोधी पथक दोनचे वरिष्ठ निरीक्षक सुनिल थोपटे व त्यांचे पथक शुक्रवारी हद्दीत पेट्रोलींग करताना सराईत गुन्हेगार औरंगजेब उर्फ रंगा हा उरुळी कांचन येथे चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानूसार, पथकाने उरुळी कांचन येथील पांढरस्थळ गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला. अन्सारी हा रस्त्यावर काळ्या रंगाची सॅक घेऊन उभा असलेला दिसला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे असलेल्या बॅगेची तपासणी केली. त्यावेळी बॅगमध्ये २४ लाख रुपये किंमतीचे दोन किलो चरस, मोबाईल असा एकूण २४ लाख १० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. औरंगजेब सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर एक वर्षापूर्वी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो गेल्या वर्षभरापासून फरार होता.
Tags :

