महाराष्ट्र
84634
10
पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे ३७२ कोटींचे बजेट
By Admin
पोलिसांच्या भ्रष्टाचाराचे ३७२ कोटींचे बजेट
लंके यांचा आरोप : आंदोलनात 'अर्थ' संकल्पाची आकडेवारी जाहीर
गुन्हे अन्वेषणच्या अधिकाऱ्यांवर आरोप
अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. खून झाल्यानंतर तपास लागत नाहीत. अवैध मार्गाने कमाविलेली संपत्ती व तिचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जातो. आपली मागणी सोपी होती. या गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी काही चुकीच्या निलंबित कर्मचाऱ्यांची चुकीची ऑर्डर केली. निलंबित झालेल्या कर्मचाऱ्यांना बोलविता येत नाही. त्यांनी का बोलविले, असे आरोप करण्यात आले.
नीलेश लंके पोलिसांच्या गैरव्यवहाराबाबत सुरू केलेल्या उपोषणात आज तिसऱ्या दिवशी खासदार नीलेश लंके यांनी पोलिसांचा पोलखोल केला. विविध मागनि पोलिस महिन्याला ३१ कोटी अवैध मागनि वसूल करतात. म्हणजे वर्षांला ३७२ कोटी रुपये लाटतात, असा आरोप त्यांनी केला. कशा पद्धतीने हप्ते वसूल
केले जातात, याचा अर्थसंकल्पच जाहीर करण्यात आला.
लंके यांनी गेल्या तीन दिवसांपासून
पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
GG गेल्या तीन दिवसांपासून खासदार नीलेश लंके यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी केलेल्या आरोपाबाबत तातडीने चौकशी करण्याची गरज आहे. हे आंदोलन राज्यपातळीवर जाईल. राज्य सरकार अशा चुकीच्या कर्मचाऱ्यांना पाठीशी घालते आहे. आम्हाला महाराष्ट्राच्या पोलिसांबद्दल अभिमान आहे, तथापि काही अधिकाऱ्यांमुळे पोलिसांची प्रतिमा मलीन होत आहे.
प्राजक्त तनपुरे, आमदार
लंकेंच्या आरोपानुसार असे मिळतात पोलिसांना वार्षिक हप्ते (सर्व आकडे अंदाजे)
• चंदन व रेशनिंग : महिन्याला ४० लाख
■ लोखंड व्यावसायिक : ५ लाख ६० हजार
• गुटखाविक्री : ६८ लाख
• कॅफे : ५० लाख
• आयपीएलवाले, सट्टाबाजार : ५० लाख
• हॉटेल्स (लस्सी व्यावसायिक) ३० लाख
■ नगर शहरातील अवैध धंदे : ५० लाख
• मटक्याच्या टपऱ्या : ७ कोटी ५० लाख
■ बिंगो लॉटरी : १ कोटी ४० लाख
■ माव्याच्या टपऱ्या : ३ कोटी ३० लाख
■ विनापरवाना हॉटेल : ७५ लाख
पेट्रोल-डिझेल डेपो : १२ लाख ५० हजार
• जुगाराचे अड्डे : ७५ लाख
सुगंधी सुपारी: २५ लाख
■ वाळू व्यवसाय : ट्रॅक्टरच्या माध्यमातून २ कोटी ५०, वाळू गाड्या- ४ कोटी ८० लाख, जेसीबीकडून १ कोटी ४० लाख, पोकलेन ५० लाख.
Tags :

