महाराष्ट्र
3110
10
राजळे महाविद्यालयात कौशल्य वृद्धिंगत कार्यशाळा संपन्न
By Admin
राजळे महाविद्यालयात कौशल्य वृद्धिंगत कार्यशाळा संपन्न
करिअरसाठी कौशल्य विकास गरजेचा - अभिजित पताडे
पाथर्डी- प्रतिनिधी
करिअर घडवण्यासाठी कौशल्यांचा विकास करण्याशिवाय पर्याय नाही, पण कोणकोणत्या कौशल्यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे याबाबत अनेकांचा गोंधळ उडतो. आजच्या स्पर्धात्मक युगात टिकून राहायचे असेल तर कौशल्याचा विकास करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अभिजित पताडे यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील दादापाटील राजळे कला,विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात संगणकशास्र विभाग, रसायनशास्र विभाग व प्लेसमेंट सेल तसेच अमेरिकन इंडिया फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यासाठी दोन दिवसीय “डेल फ्युचर वर्कस्पेस स्किल” कार्यशाळाचे आयोजन दिनांक ११ व १२ फेब्रुवारी २०२३ रोजी प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते. दि. ११ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन अहमदनगर येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च चे प्रा. विजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी डॉ. एम. एस. तांबोळी होते.या प्रसंगी नॅक समन्वयक डॉ. राजू घोलप हे उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी मास्टर ट्रेनर म्हणून अभिजित पाताडे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्याना परिचय पत्र तयार करणे,आत्मविश्वास वाढवणे, मुलाखत देताना कसे बोलावे अश्या बऱ्याच विषयांवर प्रशिक्षण दिले. तसेच मुलाखती चे कौशल्यावर वैयक्तिक रित्या मार्गदर्शन करुन, चलचित्रपट दाखवून व प्रत्यक्ष व्यासपीठावर उभे राहून संभाषण कौशल्य विद्यार्थ्यानकडून करुन घेऊन त्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण केले. दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. भास्करराव गोरे होते. प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना आजचा काळ हा ग्लोबल बिझनेसचा आहे, त्यात आपण फक्त कोणत्या एका विशिष्ट प्रांतातील किंवा फक्त आपल्या देशातील लोकांबरोबर देवाण- घेवाण करत नाही तर आंतरराष्ट्रीय बिझनेसच्या संपर्कात येतो. वेगवेगळे देश, त्यांच्या काम करण्याच्या पद्धती किंवा परदेशात जाऊन वास्तव्य करणे अशी वेळ आल्यास हे सगळे कौशल्य आत्मसात केले असतील तर एक यशस्वी करिअर घडवण्यात कोणतीच अडचण येत नाही, असे ते म्हणाले. प्रस्ताविक रसायनशास्र विभागप्रमुख डॉ.साधना म्हस्के यांनी केले. संगणकशास्र विभागप्रमुख प्रा. चंद्रकांत पानसरे यांनी या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम पाहिले. यावेळी संगणकशास्र विभागातील विद्यार्थी श्रद्धा कचरे, क्षितिजा नवल, ऋतुजा मेघाले, गायत्री साठे, आनंद बर्डे यांनी मनोगत व्यक्त करतांना श्री अभिजित पाताडे यांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे आत्मविश्वास वाढल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अंकिता इंगळे यांनी केले तर आभार प्रा. योगिता इंगळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. अस्लम शेख, प्रा. आंज्यूम सय्यद , प्रा. तेजेस्विनी राजळे, श्री. योगेश वावरे, भाऊसाहेब म्हस्के, विष्णु सापते यांनी सहकार्य केले.
Tags :

