जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी मा.शिवाजी कर्डीले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी मंत्री व मा. आ. शिवाजी कर्डिले हे विजयी झाले. कर्डिले यांना दहा मते तर मा. आ. चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. तसेच एक मत बाद झाले.
सन २०२० मध्ये जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत बँकेच्या २१ संचालकां पैकी राष्ट्रवादीचे १०, काँग्रेसचे ४, भाजपचे ६ व १ शिवसेना असे पक्षीय संचालक विजयी झाले. बँकेच्या निवडणुकीत अध्यक्षपद राष्ट्रवादीला व उपाध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले होते.
त्यावेळी महानगर बँकेचे अध्यक्ष व युवा नेते ॲड. उदय शेळके यांना अध्यक्ष करण्यात आले. परंतु दुदैवाने काही दिवसां पूर्वी प्रदीर्घ आजाराने उदय शेळके यांचे निधन झाल्याने अध्यक्षपद रिक्त झाले होते.
त्यामुळे जिल्हा बँकेचे नवीन अध्यक्ष कोण, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडीकडून अध्यक्ष पदासाठी मा. आ. चंद्रशेखर घुले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. तर भाजपाकडून शिवाजी कर्डिले यांचा उमेद्वारी अर्ज होता.
घुले-कर्डिले यांच्यात सरळ लढत झाली. या लढतीमध्ये कर्डिले यांना १० तर घुले यांना ९ मते मिळाली. तर १ मत बाद झाले. अध्यक्ष पदावर शिवाजी कर्डिले विजयी झाल्या नंतर कर्डिले समर्थक व भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाची करून आनंदोत्सव साजरा केला.