पाथर्डी तालुक्यातील देवराई बंधाऱ्यात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
नगर सिटीझन live टिम-
पाथर्डी तालुक्यातील देवराई गावाजवळील बंधाऱ्यात तिसगाव व व परिसरातील गावात जिलेबी विक्री व्यवसायासाठी काही दिवसांपासून स्थायिक असलेल्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास ते बंधाऱ्यातील पाण्यात आंघोळ करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला.
तिसगाव व परिसरातील गावात मिठाईचा व्यवसाय करण्यासाठी राजस्थान येथून काही कुटुंब येथे स्थायिक झाले आहेत. यामधील प्रणव पांडूरंग कुचेकर ( वय 17, रा. बीड), मनेष देवराबी भाभी बिष्णोई (रा. जोधपूर, राजस्थान), लादुराव जगन्नाथ पालेवाल (रा. जोधपूर, राजस्थान) हे तिघे तरुण गुरुवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास देवराई येथील बंधाऱ्यात आंघोळ करण्यासाठी गेले होते.
बंधाऱ्यातील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे यापैकी प्रणव व मनेश या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर लादूराम सुदैवाने बचावला.
त्याने महामार्गावर येत आरडाओरड करून मदत मागितली. आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी येऊन या तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप राठोड, सहाय्यक फौजदार रवींद्र चव्हाण ,पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर बेरड यांनी घटनास्थळी येत या दोन तरुणाचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डीला पाठवले.