संत सेवालाल महाराज यांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील आंबेवाडी तांडा येथे धार्मिक व अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असलेले बालब्रह्मचारी विष्णुदास महाराज वडवणी व राष्ट्रसंत रामराव महाराज यांचे वंशज ह. भ. प. नेहरू महाराज पोहरादेवी, जिल्हा वाशिम यांचे हस्ते विधिवत पूजा करून माता जगदंबा देवी तसेच क्रांतिकारी विचारांचे संत सेवालाल महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
जगदंबा देवी आणि संत सेवालाल महाराजांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने सलग तीन दिवस धार्मिक विधी, कलश मिरवणूक व शेवटी काल्याच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. शेवटच्या दिवशी भव्य महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रम ह. भ. प. विठ्ठल महाराज यांचे मार्गदर्शनाखाली पार पडला.
कार्यक्रमासाठी हेड कॉन्स्टेबल अरविंद चव्हाण, वसंत चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य इंजि.मयुर चव्हाण, सुभाषसेठ राठोड, परसराम राठोड, साहेबराव महाराज, राजेंद्र चव्हाण, अनिल चव्हाण, दिलीप राठोड, अशोकसेठ चव्हाण, रविंद्र चव्हाण, योगेश राठोड, मानसिंग राठोड, दत्तात्रय राठोड, मानसिंग राठोड ,शांताराम चव्हाण, सचिन राठोड, मेजर एकनाथ राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.