आमोद नलगे यांची सचिवपदी निवड झाल्याबद्दल सत्कार
अहमदनगर- प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेतील आमोद नलगे सर यांची जिल्हा बहुजन शिक्षण संघटना कार्यकारणीमध्ये सचिव पदी व अध्यक्षपदी राम जाधव यांची निवड झाली आहे. या वेळी संघटनेची माहीती व कार्य सोनवणे सर यांनी स्पष्ट केली
संघटना ही बहुजनांची म्हणजेच कोणत्याही जाती धर्माची नसून सर्व शिक्षक विद्यार्थी पालक आणि समाजात शिक्षणापासून वंचित असणारे सर्व घटक यासाठी ही संघटना काम करते या पुढे प्रत्येक तालूक्यात कार्यकारणी बनवून संघटन वाढवू आणि समाजाला शैक्षणिक दिशा दाखवू, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रश्न व समस्या अडचणी सोडवू असे सचिव आमोद नलगे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
नवीन कार्यकारणीत जिल्हा अध्यक्षपदी राम जाधव कार्याध्यक्षपदी योगेश दरेकर, उपाध्यक्षपदी शंकर तातळे, सहसचिवपदी शंकर यलदोड यांची निवड करण्यात आली आहे. पुढील कार्यकारणी जाहीर करण्याचा अधिकार अध्यक्ष आणि सचिव यांना देण्यात आला सर्वानुमते देण्यात आला.
निवडीस राज्य अध्यक्ष उत्तरेश्वर मोहळकर, महासचिव निकम सर, उपाध्यक्ष लोंढे, सरराज्य कार्यकारणी प्रमूख पगारे , रयत बँक संचालक तूपे सर आदी मान्यवर उपस्थित होते.