अवकाळी पाऊस गारपीटने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे
नगर सिटीझन live team-
पाथर्डी शहरातुन जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टनम या राष्ट्रीय महामार्गवरील अमरधाम येथील लिंबाचे मोठे झाड कोसळले.यामध्ये अमरधाम येथील म्हसणजोगीच्या घराचे प्रचंड नुकसान झाले असून,महामार्गावरून जाणाऱ्या ट्रॅक्टरवर देखील हे झाड पडले. ट्रॅक्टरचे देखील मोठे नुकसान झाले आहे.सुदैवाने जीवित हानी अथवा कुणीही जखमी नाही.
पाथर्डी तालुक्यात कासार पिंपळगाव परीसरात शनिवारी दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गाराचा अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने वेळीच नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परीसरातील शेतकऱ्यांच्या वतीने होत आहे.
परीसरात दुपारी अचानकपणे वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे कांदा, संत्रा, गहू,हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कारखान्याकडे
ऊस घेऊन जाणारी बैल ऊसटायरची वाहतूकही ठप्प झाली होती.
वादळी वाऱ्यासह पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांतील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. काही शेतांतील गोठ्यांवरील तसेच घरांवरील टिनपत्रे उडाली.
वादळी वाऱ्यामुळे झाडी उन्मळून पडली.
काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. एकूणच उन्हाळी विविध पीक घेणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. परिसरात झालेल्या वादळीवाऱ्यासह पावसामुळे ऊस,भुईमूग, गहू,संञा,दाळींब पिक तसेच उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेला गहू व हरभरा भिजल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.
सोसाट्याचा वाऱ्यामुळे अचानक विद्युत पुरवठाही खंडीत झाला होता.