महाराष्ट्र
08-Jan-2025
श्रीविवेकानंद विद्या मंदिरच्या उपकरणांची जिल्हास्तरावर निवड
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी पंचायत समिती, शिक्षण विभाग व तालुका गणित - विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५२ वे तालुकास्तरीय विज्ञान - गणित प्रदर्शनात श्री विवेकानंद विद्यामंदिरच्या चार उपकरणांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे.
जिल्हास्तरावर निवडले गेलेले
यशस्वी विद्यार्थी चि. डांगे शर्विल अतुल (१ली ते ५वी गट गणित) प्रथम क्रमांक, चि. शिरसाट अजिंक्य श्याम(१ली ते ५वी विज्ञान गट) दुसरा क्रमांक,चि. एकशिंगे सोहम संदीप (६ली ते ८वी गणित गट) प्रथम क्रमांक, कु. कराड ज्ञानेश्वरी विष्णू (६ली ते ८ वी विज्ञान गट) -प्रथम क्रमांक. या सर्व विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष अभयआव्हाड, उपाध्यक्ष ॲड. सुरेशराव आव्हाड, सर्व कार्यकारणी सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक शरद मेढे, सर्व शिक्षक बंधू- भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी, मार्गदर्शक शिक्षक पर्यवेक्षक घारे, श्रीमती बोराडे, श्री सरोदे, श्री धस, ज्ञानेश्वर गायके, श्रीमती रणदिवे, श्री कचरे, श्रीमती धायतडक यांनी यशस्वी विद्यार्थीचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.