पाथर्डी तालुक्यातील पाडळी गावात सव्वा 5 लाखांचा ऐवज लंपास
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील पाडळी येथील बाळासाहेब कारभारी कचरे यांच्या राहात्या घरातील बंद खोलीचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे सव्वा पाच लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
बाळासाहेब कचरे यांनी फिर्यादीत म्हटले की, 21 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजता जाग आल्यावर खोलीचा दरवाजा उघडण्याच्या प्रयत्न केला असता, तो उघडला नाही. तेव्हा घराच्या दरवाजाच्या कड्या कोणीतरी बाहेरुन लावल्याचे लक्षात आले. लगेच गावातील लोकांना फोन करून माहिती दिली.
त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने घराच्या खोल्यांच्या कड्या उघडल्या. आई वच्छलाबाई व बाळासाहेब कचरे यांनी घरात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असलेली खोलीचा दरवाजाचे कुलूप तुटून दरवाजा उघडा दिसला. खोलीतील पिशव्याची, पेट्याची व डब्यांची उचकापाचक करून डब्यात व पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेली. या घटनेत रोख रक्कम चार लाख पंधरा हजार आणि एक लाखाच्या सोन्याच्या अंगठ्या असा पाच लाख पंधरा हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेली. त्यावरून पाथर्डी पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.