शिक्षक मतदारसंघाची महाराष्ट्र राज्य निवडणूक जाहीर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
राज्यातील महापालिका निवडणुकीची अनिश्चितता कायम असतानाच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. राज्यातील शिक्षक मतदारसंघातील निवडणूक जाहीर करण्यात आली असून आगामी नव्या वर्षात ३० जानेवारी रोजी ही निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्र शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी ३० जानेवारीला मतदान होणार आहे, तर याची मतमोजणी ही २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. नाशिक अमरावती, औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागासाठी शिक्षक मतदारसंघाची निवडणूक नववर्षात होणार आहे. मतदान होणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे.