विकास कामासाठी कोणताही तालुका निधी अपूर्ण पडणार नाही- अभिजीत कदम
शिवसेना बैठकीत महिला शिवसेना जिल्हाप्रमुख शोभाताई अकोलकर यांची निवड
पाथर्डी प्रतिनिधी:
अहमदनगर जिल्हा शिवसेना पक्षाचे (बाळासाहेबांची शिवसेना) निरीक्षक अभिजीत कदम नगर जिल्हा दौऱ्यावर आले असता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय अहमदनगर येथे शिवसेनेची नुकतीच बैठक पार पडली.
या बैठकीत कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी घर तेथे शिवसैनिक, गाव तिथे शाखा तसेच शाखाप्रमुख, बुथप्रमुख, शिवदूत यांच्यावर सर्वस्वी कामाची जबाबदारी देण्यात आली आणि विकास कामाच्या बाबतीत कोणताही तालुका निधी अपूर्ण पडणार नाही, अशी ग्वाही यावेळी कदम यांनी दिली.
दरम्यान बैठकीत शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. पाथर्डी येथील शोभाताई अकोलकर यांची महिला शिवसेना जिल्हाप्रमुख, महिला शिवसेना तालुकाप्रमुख गीताताई मर्दाने, महिला उपप्रमुख मरबीन शेख यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांच्यावर शेवगाव- पाथर्डी व राहुरी मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली.
यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख सचिन जाधव, जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले, अनिलशेठ शिंदे, उपजिल्हाप्रमुख अंकुशराव चितळे, पाथर्डी शहर प्रमुख दत्ता पवार, पाथर्डी तालुका संघटक ऋषिकेश गव्हाणे आदी उपस्थित होते.