महावितरणच्या वीज कर्मचाऱ्यांचा अपघातात मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील धामोरी येथील महावितरण शेवगाव करंजी सब डिविजन येथील लाईन मन वीज तात्रिक कामगार सहकारी संघटनेचे माजी चेअरमन कै. माधव कारभारी पटारे यांना २७ डिसेंबर 2022 रोजी कामावरून घरी परतताना तिसगाव जवळ पुलाजवळ एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले.
स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना अहमदनगर येथील साईदीप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात पुण्याहून दोन दिवसानंतर पुढील शस्त्रक्रियेसाठी यांना पुणे येथील संचेती हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पुणे येथे दहा दिवस उपचार घेतल्यानंतर काल दि ८ जानेवारी रोजी दुपारी 12.30 वाजता अखेर शेवटचा श्वास घेतला व त्याची प्राणज्योत मावळली. आज सकाळी ठीक नऊ वाजता त्यांच्या मूळ गावी धामोरी ठीक नऊ वाजता हजारो जन समुदायाच्या उपस्थिती त त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नेवासा तालुका शेवगाव तालुका व पाथर्डी कर्जत तालुक्यातील वीज कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मृत्यु पश्चात त्यांना एक मुलगी एक मुलगा भाऊ पत्नी व आईअसा त्याचा परिवार आहे घडलेल्या घटनेमुळे परिसरात व पटारे कुटुंबीयावर दुःखाचा डोगर कोसळला आहे व सर्व परिसरातून व मित्रपरिवार व सर्व तांत्रिक वीज कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे