शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांचे अचानक आंदोलन ! मुंबईतील घरावर चप्पल आणि दगडफेक !
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
ठिय्या आंदोलन केल्याची घटना आज घडली आहे.
आज दुपारी अचानकपणे हा जमाव शरद पवारांच्या घरावर धडकला. त्यावेळी या ठिकाणी केवळ दोन पोलिस कर्मचारी होते. ते या आंदोलकांना आवरू शकले नाहीत. या कर्मचाऱ्यांनी जवळपास पाऊणतास या ठिकाणी गोंधळ घातला. या वेळीच बंगल्यावर चप्पलफेक तसेच दगडही फेकण्यात आले.
१०० ते १५० एसटी कर्मचारी अचानक मुंबईतील शरद पवार यांच्या सिव्हर ओक या निवासस्थानावर धडकले. त्यांनी चपला फेकल्या, मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केली.
खासदार सुप्रिया सूळे यावेळी या जमावाला सामोऱ्या गेल्या. त्यांनी या या जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतू जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिसफाटा तैनात करण्यात आला. पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
या संदर्भात काल न्यायालयाने निर्णय दिला असून कर्मचाऱ्यांना कामावर जाण्याचे आदेश दिले आहेत.
या सगळ्या प्रकाराने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते यावर प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.