आंबादास माने यांचे निधन
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी येथील कै आंबादास आनंदा माने यांचे नुकतेच वृध्दपकाळाने निधन झाले.मृत्युसमयी ते ८५ वर्षाचे होते. सामाजिक व धार्मिक कार्यात त्याचे योगदान होते ते गावात आण्णा नावाने परीचित होते त्यांच्या पश्चात २ मुली २ मुले सुना नातवंडे असा मोठा परीवार असुन शिक्षक संभाजी माने यांचे वडील व ग्रामपंचायत सदस्त्र योगेश माने यांचे आजोबा तर भाजपा युवा मोर्चा शेवगाव तालुका उपाध्यक्ष सोमनाथ कळमकर यांचे ते आजोबा होते. त्यांच्या दुःखत निधनाने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनी कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले.