महाराष्ट्र
पाथर्डी-मुकबधीर गतिमंद मुलीवर धक्कादायक प्रकार;व्यक्तीस अटक
By Admin
पाथर्डी-मुकबधीर गतिमंद मुलीवर धक्कादायक प्रकार;व्यक्तीस अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी येथील मुकबधीर व गतिमंद युवतीवर अत्याचार करणाऱ्यास पोलिसांनी पाच महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर शोधून काढले आहे. याप्रकरणी मुलीच्या काकाला पोलिसांनी गजाआड केले आहे.
पोलिसांनी याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 30 जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधीश व्ही. आय. शेख यांनी दिले आहेत.
पाथर्डी तालुक्यातील एका गावामधील गतिमंद व मुकबधीर युवतीचे पोट दुखू लागल्याने तिला दवाखान्यात नेले. तेथे ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर 2 मार्च 2022 रोजी युवतीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली होती. या घटनेचा तपास करण्याचे पोलिसांसमोर कडवे आव्हान होते.
पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण पाटील, सागर मोहिते यांनी या प्रकरणाचा तपास केला. पीडित मुलीला बोलता येत नव्हते, ऐकू येत नव्हते व ती गतिमंदही होती. पोलिसांनी खूप प्रयत्न केले. मूकबधीर विद्यार्थ्यांचे शिक्षक घेऊन तपास केला. सुमारे वीस लोकांच्या रक्ताचे नमुने घेऊन नाशिक येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत तापसणीसाठी पाठविले. पीडितेच्या काकाचे नमुने घेतल्यापासून त्याचे वागणे संशयास्पद असल्याचे पोलिसांना जाणवले होते. त्याच्यावर लक्ष ठेवले गेले, अखेर रविवारी नाशिकच्या प्रयोगशाळेचा अहवाल पोलिसांना मिळाला. त्यामधे काकाच मुलीला गर्भवती करणारा असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली.
सोमवारी आरोपी काकाला तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रविण पाटील यांनी न्यायाधीश व्ही.आय. शेख यांच्यासमोर हजर केले. शिंदे याला पाच दिवसाची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शेख यांनी दिले आहेत. गतिमंद मुलीवर अत्याचार करणारा 72 वर्षे वयाचा नराधम पोलिसांनी शोधून काढल्याने पोलिसांचे कौतुक होत आहेत.
आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी गेल्या पाच महिन्यापासून मोठे परिश्रम घेऊन ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक मनोज पाटील साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे, पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली हा तपास पूर्ण करून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या.
Tags :
20166
10