महाराष्ट्र
भरपावसात ताडपत्री धरून आदिवासी व्यक्तीचा अंत्यविधी; गावात अंत्यविधीसाठी शेड सुविधाचा अभाव
By Admin
भरपावसात ताडपत्री धरून आदिवासी व्यक्तीचा अंत्यविधी; गावात अंत्यविधीसाठी शेड सुविधाचा अभाव
श्रीगोंदा तालुक्यातील भिंगान गावातील घटना
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अनेक कालखंड मुलभूत प्रश्नांपासून उपेक्षित असलेले तालुक्यातील भिंगान गाव (Bhingan Gaon) सर्व तालुक्याला परिचित आहे. वीज, पाणी आणि रस्ते यापासून खूप दूर राहिलेल्या या गावाला पूर्वपदावर आणण्यासाठी अनेकांनी संघर्ष केला.
श्रीगोंदा : अनेक कालखंड मुलभूत प्रश्नांपासून उपेक्षित असलेले तालुक्यातील भिंगान गाव (Bhingan Gaon) सर्व तालुक्याला परिचित आहे. वीज, पाणी आणि रस्ते यापासून खूप दूर राहिलेल्या या गावाला पूर्वपदावर आणण्यासाठी अनेकांनी संघर्ष केला. पावसाळ्यामध्ये पाण्याने वेढून इतर गावं तसेच तालुक्याच्या संपर्कातून तुटणारे हे गाव येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उदासीनतेमुळे विकासापासूनच वंचित राहिलेले आहे.
आदिवासी भिल्ल समाजाची लक्षणीय लोकसंख्या असलेले हे ठिकाण दुर्लक्षित राहण्याचे कारण समजू शकले नाही. त्यातच गुरुवारी (दि.28) माणसाला माणसाच्या माणूसपणावरच प्रश्न निर्माण व्हावा..! अशी दुर्दैवी घटना एका आदिवासी कुटुंबाबरोबर घडली आहे आणि त्या घटनेमुळे येथील प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भिंगान येथील रहिवासी असलेले अंकुश गुलाब गायकवाड या आदिवासी भिल्ल समाजाच्या व्यक्तिचा गुरुवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आणि कुटुंबावर आभाळच कोसळले. नुसते कुटुंबावरच नाही. तर यांच्या अंत्यविधीवरही आभाळ कोसळले. दुर्भाग्याची चरम सीमा काय असावी? याचे जिवंत चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले आहे.
अंकुश गायकवाड यांचा अंत्यविधी करताना भरून आलेल्या आभाळातून कोसळणाऱ्या सरी यांच्या मृत्यूमुळे डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंइतक्या वेदनादायी ठरल्या. कारण, मृतदेहाला अग्निसंस्कार करताना आलेल्या पावसामुळे चिता भिजण्याचा धोका निर्माण झाला. येथील ग्रामपंचायत असलेल्या चोराची वाडीने नमूद ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी शेड उभा केलेले नाही. कोणतेही सुविधा नसल्याने नमूद अंत्यविधी ग्रामस्थांना उभ्या पावसात करावा लागला. अक्षरश: चितेवर ताडपत्री धरून, सर्व लोकांनी त्या ठिकाणी हा अंत्यविधी पार पाडला आहे.
Tags :
79084
10